PM Modi oath ceremony LIVE
PM Modi oath ceremony LIVE Sarkarnama
देश

PM Modi oath ceremony LIVE: Modi 2.0 मधील स्मृती इराणी, अनुराग ठाकुर, दानवे यांच्यासह 20 जणांचा Modi 3.0 मधून पत्ता कट

Mangesh Mahale

नरेंद्र मोदी (Modi 3.0 Cabinet) थोड्याच वेळात हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मंत्रिपदासाठी ज्यांना 'पीएमओ'मधून फोन करण्यात आले आहे, ते शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहचले आहेत. महाराष्ट्रातून सहा जणांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

मोदी सरकार 2.0 मध्ये अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळालेल्या भाजपच्या 20 दिग्गजांची नावे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत (PM Narendra Modi oath ceremony 2024) नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नावे संभाव्य मंत्र्यांच्या यादीतून गायब आहेत. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर अद्याप या 20 नेत्यांना फोन आलेला नाही.

या 20 नेत्यांना फोन नाही

  1. रावसाहेब दानवे

  2. कपिल पाटिल

  3. भारती पवार

  4. अश्विनी चौबे

  5. नारायण राणे

  6. भागवत कराड

  7. अजय भट्ट

  8. साध्वी निरंजन ज्योति

  9. मीनाक्षी लेखी

  10. राजकुमार रंजन सिंह

  11. जनरल वीके सिंह

  12. आरके सिंह

  13. अर्जुन मुंडा

  14. स्मृती इराणी

  15. अनुराग ठाकुर

  16. राजीव चंद्रशेखर

  17. निशीथ प्रमाणिक

  18. अजय मिश्रा टेनी

  19. सुभाष सरकार

  20. जॉन बारला

22 खासदारांची बैठक

शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक झाली. या बैठकीला 22 खासदार उपस्थित होते.

1. सर्बानंद सोनोवाल, 2. चिराग पासवान, 3. अन्नपूर्णा देवी, 4. मनोहर लाल खट्टर, 5. शिवराज सिंह चौहान, 6. भागीरथ चौधरी, 7. किरेन रिजिजू, 8. जितिन प्रसाद, 9. एचडी कुमारस्वामी, 10. ज्योतिरादित्य शिंदे, 11. निर्मला सीतारमण, 12. रवनीत बिट्टू, 13. अजय टमटा, 14. राव इंद्रजीत सिंह, 15. नित्यानंद राय, 16. जीतन राम मांझी, 17. धर्मेंद्र प्रधान, 18. गजेंद्र सिंह शेखावत, 19. हर्ष मल्होत्रा, 20. एस जयशंकर, 21. सीआर पाटिल, 22. कृष्णपाल गुर्जर

महाराष्ट्रातून 6 जणांचा मंत्रिमंडळात समावेश

  1. नितीन गडकरी, भाजप, विदर्भ

  2. पियुष गोयल, भाजप, मुंबई

  3. रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र

  4. मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र

  5. रामदास आठवले, आरपीआय

  6. प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT