Sunil Takare, PM Narendra Modi, Praful Patel Sarkarnama
देश

PM Narendra Modi Oath Ceremony Live : मोदींच्या कॅबिनेटमध्ये ना पटेल, ना तटकरे? फडणवीस दिल्लीत NCP नेत्यांच्या भेटीला

Rajanand More

New Delhi : एकीकडे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असलेल्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोनाफोनी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रिपदाची शपथ घेणारे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत असताना राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे किंवा खासदार प्रफुल पटेल यांना अद्यापही फोन आलेला नाही.

पटेल आणि तटकरे या दोघांपैकी एकालाही फोन न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे इतर नेतेही तडकरेंच्या निवासस्थानी आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शपथविधी सायंकाळी असल्याने दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सायंकाळपर्यंत आशा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना तसे संकेतही दिले आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंत फोन आला तर आनंद होईल, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले आणि नारायण राणे हे रविवारी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेतून केवळ जाधव यांनाच फोन आला आहे. राष्ट्रवादीतील कुणालाच फोन न आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नरेंद्र मोदी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जवळपास चार डझन खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे तेलुगू देसम पक्षाचे दोन आणि संयुक्त जनता दलाचे दोन खासदार आहेत. तसेच चिराग पासवान, जयंत चौधरी, एच. डी. कुमारस्वामी, अनुप्रिया पटेल हे घटकपक्षातील प्रमुख नेतेही शपथ घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT