Narendra Modi Sarkarnama
देश

PM Modi: सत्तेत येण्यापूर्वीच मोदींनी केले तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीच्या 100 दिवसांचे नियोजन

PM Modi 100 days for 3rd Term: माझ्या कामाच्या पद्धतीचे निरीक्षण तुम्ही केले असेल तर नवीन सरकारच्या सुरुवातीच्या १०० दिवसांचे नियोजन आखून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची ही माझी पहिलीच वेळ नाही. गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासून मी हे करीत आहे,"

सरकारनामा ब्यूरो

Bhubaneswar news, 20 May: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (PM) विराजमान करण्यासाठी भाजपने संकल्प केला आहे. मोदींना रोखण्यासाठी विरोधकांनी एकजूट करीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखली आहे. भाजपने '400पार'ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सत्तेत आल्यास काय करणार, याबाबत सांगितले. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पुढील सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा १०० दिवसांचा आराखडा तयार करण्याची सूचना मोदी यांनी सर्व मंत्रालयांना केली होती. "लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता आदींची अंमलबजावणी करण्याचे संकेत देत भाजपच्या जाहिरनाम्यातील आश्वासने आपले सरकार पूर्ण करेल," असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, "यापूर्वी, २०१९ आणि २०१४ च्या निवडणुकीतही ही संकल्पना राबविली होती. त्यानंतर नवीन सरकारने पहिल्या दिवसापासून अंमलबजावणी सुरु केली होती. माझ्या कामाच्या पद्धतीचे निरीक्षण तुम्ही केले असेल तर नवीन सरकारच्या सुरुवातीच्या १०० दिवसांचे नियोजन आखून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची ही माझी पहिलीच वेळ नाही. गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासून मी हे करीत आहे,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या निकालानंतर चार जूननंतर त्याला सुरुवात होईल. वेळेवर परिणामकारक निर्णय घेऊ. वेळ वाया न घालवता थेट कृती करू. आमचे सरकार याच गतीने काम करते. दूरदर्शी विचार व धोरणात्मक नियोजनावर आमचा विश्वास आहे, असेही मोदींनी नमूद केले.

"२०१९ मध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या १०० दिवसांत आम्ही कलम ३७० रद्दकेले. तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा संमत केला होता. याच धर्तीवर यावेळीही आम्ही आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीच्या १०० दिवसांचे नियोजन सुरू केले आहे," असे मोदींनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT