Mahakumbh Mela, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Mahakumbh Mela 2025 Fire : महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव; पंतप्रधान मोदींकडून दखल, नेमकं काय घडलं?

PM Narendra Modi CM Yogi Adityanath Prayagraj fire incident : प्रयागराजमधील सेक्टर 19 मध्ये महाकुंभ मेळ्यातील तंबूंना आज दुपारी भीषण आग लागली होती.

Rajanand More

MahaKumbh Update : महाकुंभ मेळ्यासाठी रविवारचा दिवस भयंकर ठरला. प्रयागराजमधील सेक्टर 19 मध्ये सिलेंडरच्या स्फोटाने दुपारी आगीचा भडका उडाला. ही आग वेगाने पसरल्याने महाकुंभमधील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: घटनास्थळी पोहचले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेतली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात केल्या आहेत. त्यामुळे आगीची माहिती मिळताच तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तसेच एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य हाती घेण्यात आले.

तातडीने केलेल्या प्रय़त्नांमुळे कमी वेळेत आग आटोक्यात आणता आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगींनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी योगींना फोन करत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच बचावकार्य आणि पुढील सुविधांसाठी आवश्यक मदतीसाठीही आश्वस्त केल्याचे समजते.

आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कुणीही जखमी झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आग लागल्यानंतर जवळच्या तंबूतील भाविक व साहित्यही तातडीने हलवण्यात आले. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

दरम्यान, महाकुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास आठ कोटी भाविकांनी महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला आहे. रविवारी जवळपास 47 लाख भाविकांनी गंगा स्नान केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मेळ्यामधील भाविकाचा आकडा जवळपास 45 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT