Nawab Malik News : मलिकांनी मुद्दा लावून धरत मुंडेंची केली कोंडी; पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण आलं बाहेर

Dhananjay Munde NCP Party Shibir Shirdi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात माजी मंत्री नवाब मलिक यांनी पक्ष हितासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेण्याची मागणी केल्याचे समोर आलं आहे.
Dhananjay Munde, Nawab Malik
Dhananjay Munde, Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय 'मकोका' कायद्यात अटक असलेला वाल्मिक कराड याच्यावर हत्येच्या कटाचा गुन्हा आहे. यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अडचणीत सापडलेल्या मुंडेंची पक्षातील नेते नवाब मलिक यांच्या मागणीमुळे अधिकच कोंडी झाल्याचे समोर आले आहे.

'एका जिल्ह्यातील प्रकरणामुळे पक्षाची राज्यात बदनामी होत आहे. त्यामुळे पक्ष हितासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा', अशी मागणी माजी मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात केली. नवाब मलिक यांच्या या मागणीमुळे मंत्री मुंडे यांची पक्षातूनच कोंडी होत असल्याचे समोर आलं आहे.

Dhananjay Munde, Nawab Malik
Dhananjay Munde News : अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात..! धनंजय मुंडेंना सतावतेय ‘ही’ भीती

नवाब मलिक यांनी नवसंकल्प शिबिराच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधान केल्याची माहिती समोर आल्याने पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे. नवाब मलिक यांनी बीड जिल्ह्याचा थेट उल्लेख न करता पक्ष हितासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. त्यातून या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. ते पक्षाच्या वाटचालीस योग्य नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

अजितददांसमोर केली मागणी

बीड जिल्ह्यातील प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. म्हणजेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजीनामा घेतला पाहिजे. असा रोख नवाब मलिक यांच्या मागणी पाठीमागे होता. पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच नवाब मलिक यांनी ही भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे.

Dhananjay Munde, Nawab Malik
Dhananjay Munde : गंभीर आरोपांनी घायाळ झालेल्या मुंडेंनी अखेर पलटवार केलाच; म्हणाले, मला काय बदनाम करायचं ते करा,पण...

अजितदादांकडून मंत्री मुंडे यांना अभय

नवसंकल्प शिबिरात अजितदादांनी शेवटी भाषण केले. त्यावेळी मंत्री मुंडे यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणातून त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आरोपांच्या वावटळींना त्यांनी शांत केले आहे, असे म्हणत अजितदादांनी मंत्री मुंडे यांना एक प्रकारे अभय दिल्याचे दिसते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com