Sweden India partnership : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर असून आज ते नेदरलँडचा दौरा आटोपून स्वीडनमध्ये दाखल झाले. ते आठ वर्षांनंतर स्वीडमध्ये दाखल झाले आहे. सध्या जगासमोर असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामध्ये यूरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीमध्ये पंतप्रधानांचा सहभाग असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान रविवारी स्वीडनमध्ये गोथेनबर्ग विमानतळावर उतरले. त्याआधी स्वीडनच्या हवाई क्षेत्रात पंतप्रधानांचे विमान पोहोचताच स्वीडनची लढाऊ विमाने त्यांच्यासोबत होती. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधानांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी भारतीयांनीही पारंपरिक पध्दतीने त्यांचे उत्साहात स्वागत केले.
पीएम मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि स्वीडनमधील व्यापार, इनोव्हेशन, एआय आदी क्षेत्रांमध्ये विविध करार होण्याची तसेच दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी हे २०१८ मध्ये भारत-नॉर्डिक शिखर संमेलनासाठी स्वीडनमध्ये आले होते. त्यानंतर ते आज या देशात दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान क्रिस्टर्सन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी विविध संधींवर चर्चा केली जाऊ शकतो. दोन्ही देशांमधील व्यापारवृध्दीसाठी नवनवीन क्षेत्रांमधील संधींवर करार केले जाऊ शकतात. सध्या दोन्ही देशांमधील व्यापार ७.७५ अब्ज डॉलर इतका आहे. त्याचप्रमाणे स्वीडनची भारतातील गुतंवणूक २.८२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
दोन्ही देशांमध्ये प्रामुख्याने ग्रीन एनर्जी, एआय, नवीन तंत्रज्ञान, स्टार्टअप, उत्पादन पुरवठा साखळी, संरक्षणविषयक उपकरणे, अंतराळ सहकार्य आदी मुद्दयांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच युरोपीय देशांमधील एक इनोव्हेशन आधारित अर्थव्यवस्था म्हणून स्वीडनने आपला नावलौकिक बनविला आहे. यापार्श्वभूमीवर भारतालाही त्याचा उपयोग होण्यासाठी परस्पर सहकार्यावर चर्चा होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.