Congress shares Modi video : काँग्रेसच्या एका महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापले असून भाजपने जोरदार पलटवार केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी रेड कार्पेटवर चालताना दिसत आहेत. ते चहा विकताना दाखविण्यात आले आहेत. हा व्हिडीओ एआय जनरेटेड आहे.
काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ‘आता हे कोणी बनविले’ असे म्हटले आहे. एआय जनरेटेड व्हिडीओमध्ये रेड कार्पेट दिसत आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी चालत आहेत. मागे विविध राष्ट्रांचे झेंडेही आहेत. मोदींच्या एका हातात चहाची किटली तर दुसऱ्या हातात ग्लास दिसत आहेत.
‘चाय बोलो, चाय’ असा आवाजही व्हिडीओमध्ये आहे. नायक यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर भाजप नेते चांगलेच भडकले. पंतप्रधान मोदींचा हा अपमान असल्याचे नेत्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींकडून आपण लहानपणी गुजरातमधील रेल्वे स्थानकात चहा विकत असल्याचा दावा नेहमी केला जातो. त्यावरून देशभरात चाय पे चर्चा हे कार्यक्रमही घेण्यात आले. भाजप नेत्यांकडून आजही त्याचा उल्लेख सातत्याने केला जातो.
यापार्श्वभूमीवर रागिनी नायक यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावालला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सोशल मीडियातील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रेणुका चौधरी यांनी संसदेचा आणि शिवसेनेचा अपमान केल्यानंतर आता रागिनी नायक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ‘चहावाला’ पार्श्वभूमीवर हल्ला केला आहे. त्यांची खिल्ली उडवली आहे.
काँग्रेस ओबीसी समाजातील एका मेहनती पंतप्रधानांना स्वीकार करू शकत नाही. त्यांनी आधीही चहावाला म्हणून हिनवत पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली आहे. त्यांना १५० हून अधिक वेळा शिवी दिली आहे. बिहारमध्ये त्यांच्या आईवर निशाणा साधण्यात आला. लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत, अशी टीका पूनावाला यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.