Rajnath Singh claim : नेहरूंना सरकारी पैशाने बांधायची होती बाबरी मशीद, एका व्यक्तीने केला विरोध! केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Nehru Babri Masjid public fund : सोमनाथ मंदिरासाठी लोकांनी ३० लाख रुपये दान दिले होते. ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. सरकारचा एक रुपयाही त्यासाठी वापरला नव्हता, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले होते.
Babri Masjid controversy
Babri Masjid controversySarkarnama
Published on
Updated on

Babri Masjid controversy : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सरकारी पैशाने बाबरी मशीद उभारायची होती. त्यांना सरकार वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला होता, असे विधान राजनाथ सिंह यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने त्यावर पलटवार करत संरक्षण मंत्री खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

गुजरातमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापलं आहे. वडोदरामध्ये ‘सरदार सभा’ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, त्यावेळी सरदार पटेल यांनी बाबरी मशीद सरकारी पैशाने बांधण्यास विरोध केला होता. नेहरूंनी सोमनात मंदिराच्या पुनर्विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला. सरदार पटेलांनी त्यावेळी सोमनाथ मंदिराचा मुद्दा वेगळा असल्याचे स्पष्ट केले होते.

सोमनाथ मंदिरासाठी लोकांनी ३० लाख रुपये दान दिले होते. ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. सरकारचा एक रुपयाही त्यासाठी वापरला नव्हता, असे राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमात सांगितले होते. अयोध्येतील राम मंदिरालाही सरकारने निधी दिलेला नाही. देशातील लोकांनी त्याचा खर्च उचलल्याचेही ते म्हणाले आहेत.

Babri Masjid controversy
BJP Election news : दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला झटका; आपने गड राखले, काँग्रेसलाही मिळाला बूस्टर डोस...

राजनाथ सिंह यांच्या या विधानानंतर काँग्रेसचा भडका उडाला आहे. पक्षाचे खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, राजनाथ सिंह यांचे हे विधान सिध्द करणारा एकही पुरावा नाही. नेहरूंनी मंदिरांच्या पुनर्विकासासह धार्मिक ठिकाणांसाठी सरकारी पैसा वापरण्यास स्पष्टपणे विरोध केला होता. सरकार नव्हे तर लोकांच्या मदतीतून त्यासाठी निधी उभारण्यावर त्यांचा भर होता.   

नेहरूंनी लाखो लोकांचे पूजनीय प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिरासाठीही सरकारी निधी नाकारला, मग त्यांनी बाबरीवर करदात्यांच्या पैशांचा खर्च करण्याचा प्रस्ताव कसा ठेवला असेल? असा सवाल करत टागोर म्हणाले, हा दावा मूलभूत तर्क आणि ऐतिहासिक नोंदींनुसार मोडित निघतो.

Babri Masjid controversy
Rajya Sabha Live : फौजिया खान यांना राजीव शुक्लांनी काय सांगितलं? विषयच बदलला, सभापती संतापले...

राजनाथ सिंह यांची विधाने इतिहासाबद्दल नाहीत. ती राजकारणाबद्दल आहेत. वर्तमानात फूट पाडण्यासाठी भूतकाळाचे पुनर्लेखन करणे ही भाजपची रणनीती आहे: आपल्या संस्थापकांचा अपमान करणे, कथा रचणे, ध्रुवीकरणाला चालना देणे, ही रणनीती आहे. आम्ही गोडसेच्या अनुयायांना नेहरू किंवा पटेलांचा वारसा विकृत होऊ देणार नाही, अशी टीका टागोर यांनी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com