PM Modi RSS Sarkarnama
देश

Narendra Modi Address Nation : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार, संघाच्या शताब्दी कार्यक्रमात होणार सहभागी!

Narendra Modi RSS Centenary Celebration : संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आज सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातून ते देशाला संबोधित करतील.

Roshan More

Narendra Modi News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आज (बुधवार) आयोजित करण्यात येणाऱ्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी राष्ट्राल संबोधित देखील करणार आहेत.

पंतप्रधान मोदी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त टपाल नाणे आणि विशेष तिकीटाचे प्रकाशन देखील करणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा उल्लेखी जगातील सर्वात मोठी एनजीओ म्हणून केला होता. ते म्हणाले होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रसेवेची 100 वर्ष हा एक अभिमानस्पद आणि सुवर्ण अध्याय घडविला. राष्ट्र निर्माणाच्या संकल्पाने माँ भारतीची सेवा करण्यासाठी स्वयंसेवकांनी शतकानुशतकेआपले जीवन मातृभूमिच्या कल्याणासाठी समर्पित केले.

स्वयंसेवक ते पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास स्वयंसेवक ते पंतप्रधान असा राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे. 1970 ते 1980 दशकात ते संघाचे गुजरातमधील विविध जिल्ह्यात पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्यरत होते. 1990 मध्ये ते भाजपमध्ये सक्रीय झाले. आणि 2001 मध्ये ते पहिल्यांदा गुजराचे मुख्यमंत्री झाले. पुढे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT