Pune Graduate Constituency: 48 हजार मतांनी भाजपाच्या उमेदवाराला धूळ चारली, याची पुनरावृत्ती होणार का? काँग्रेसचा पुन्हा मास्टरस्ट्रोक

Pune Graduate Constituency: आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं (एमपीसीसी) आपल्या नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.
Pune Congress
Pune Congresssarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं (एमपीसीसी) आपल्या नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. यातील एक महत्त्वाची नियुक्ती म्हणजे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची समन्वयकपदीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Pune Congress
Nilesh Ghaiwal: फरार घायवळनं तात्काळ पासपोर्टचा घेतला गैरफायदा! पोलिसांची भूमिकाही संशयास्पद? नेमकं काय घडलं? जाणून घ्या

पुणे पदवीधर विभागाच्या मागच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा तब्बल ४८ हजार मतांनी पराभव झाला होता. पदवीधर मतदारसंघात पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर महापालिका, त्यांतील जिल्हा परिषदा आणि नगर परिषदा, पंचायत समित्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने राजेश पांडे यांच्यावर या मतदारसंघाबाबतची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती, त्यानंतर आता काँग्रेसने देखील बाळासाहेब थोरात यांना मैदानात उतरवले आहे.

Pune Congress
Maharashtra Floods: कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी! एकूण ६ कोटींची मदत देणार; कृषीमंत्री भरणेंची घोषणा

पुणे पदवीधर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सात प्रमुख पदवीधर मतदारसंघांपैकी एक असून, येथे पदवीधर मतदारांची संख्या मोठी आहे. सद्यस्थितीत काँग्रेससह महाविकास आघाडीला या मतदारसंघात मजबूत भूमिका घेण्याची गरज आहे. ही निवडणूक डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता असून, यासाठी पक्षाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. थोरात यांच्या या जबाबदारीमुळे काँग्रेसला पुणे विभागात नवीन ऊर्जा मिळेल, असे मत मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

Pune Congress
Maharashtra Floods: कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी! एकूण ६ कोटींची मदत देणार; कृषीमंत्री भरणेंची घोषणा

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काहिशा अलिप्त असलेल्या बाळासाहेब थोरात यांना पुन्हा पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मैदानात उतरून काँग्रेसने मास्टर स्ट्रोक मारला असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसची मजबूत पकड असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघावर ती पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी थोरात यांच्याकडे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com