G-20 Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi Dinner News : G20 साठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी करणार डिनर; तब्बल ३ हजार...

Chetan Zadpe

New Delhi News : भारतात आयोजित केले गेलेले G 20 परिषदेचे सर्वत्र कौतुक झाले. या परिषदेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार आहेत. G20 परिषदेसाठी जवळपास 3 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. मोदी आज (दि. 22 सप्टेंबर) संध्याकाळी 6 वाजता 'भारत मंडपम'मध्ये या सर्वांची भेट घेणार आहेत. (Latest Marathi News)

सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, "पंतप्रधान मोदी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्यांना संबोधित करतील. यानंतर 'भारत मंडपम'मध्येच या सर्वांसाठी डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. या 3 हजार लोकांमध्ये खासकरून अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांनी शिखर परिषद सुरळीत पार पाडण्यासाठी कष्टाचे काम केले आहे. यामध्ये सफाई कामगार, चालक, वेटर आणि विविध मंत्रालयातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वेळी विविध खात्यांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या अध्यक्षतेखाली G 20 ची यशस्वी संघटना -

नवी दिल्ली येथे भारताच्या अध्यक्षतेखाली 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे G 20 परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिखर परिषदेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, सौदी अरेबिया, अर्जेंटिना यासह जगातील सर्व शक्तिशाली देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला आहे.

यामध्ये कोणते देश आहेत ?

१९९९ मध्ये जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांची एक संघटना स्थापन झाली. त्यावेळी मोजक्याच देशांचा त्यात समावेश होता. इतर अनेक देश जसजसे आर्थिक आघाडीवर पुढे झाले, तसतसे तेही याचा एक भाग बनले. या देशांची पहिली अधिकृत बैठक 2008 मध्ये अमेरिकेत झाली.

सध्या G20 मध्ये भारताव्यतिरिक्त रशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, चीन, मेक्सिको, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, तुर्की, ब्रिटन आणि एक युरोपीय देशांचा समावेश आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT