Balasaheb Thackeray birth Anniversary 2026 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियात एक खास पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे, अशा शब्दांत मोदींनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. त्यांनी मराठीतून ही पोस्ट केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ता त्यांना पंतप्रधानानांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. सोशल मीडियात त्यांनी बाळासाहेबांसोबतचे दोन फोटोही पोस्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते.
काय म्हणाले पंतप्रधान?
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते, असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, अशी भावनाही मोदींनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
शरद पवार यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्रहिताशी कधीही तडजोड केली नाही. शब्दांची निवड करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. विविध विषयांवर संघर्ष जरी झाला तरी, आपली भूमिका कधी त्यांनी लपवून ठेवली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. राजकारणात विरोध असू शकतो, पण वैयक्तिक कटुता नसावी; हा संस्कार घालून देणारे रोखठोक व मार्मिक भाष्यकार, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, अशी शब्दांत शरद पवारांनी आदरांजली वाहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.