Mayor Election : राजधानीत इतिहास घडला! आर्थिक, सांस्कृतिक, अन् उप राजधानीचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी महिलांवर...

Women mayors India : दुसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आणि नाशिक या महानगरांमध्येही सावित्रीच्या लेकींना महापौरपदाचा मान मिळणार आहे.
Women Mayor in Maharashtra
Women Mayor in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Urban leadership women : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडती आज जाहीर झाल्या. त्यानंतर आता या महापालिकांमध्ये महापौर पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याचे आडाखे बांधण्यास सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या महानगरांमध्ये कोण महापौर होणार, याची सर्वाधिक उत्सुकता आहे.

आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता २९ महापालिकापैकी १५ ठिकाणी महिलाराज असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही महिला महापौर होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात महिलांनाच महापौरपदाची संधी मिळाली आहे.

एवढेच नाही तर दुसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आणि नाशिक या महानगरांमध्येही सावित्रीच्या लेकींना महापौरपदाचा मान मिळणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, मालेगाव, मीरा भाईंदर आणि धुळ्यातही महिला आरक्षण पडले आहे. वरील सर्व महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना संधी मिळणार आहे.

Women Mayor in Maharashtra
BMC Mayor update : मुंबईतील महापौर पदाच्या आरक्षणावरून मोठा वाद; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, माधुरी मिसाळांनी काय घेतला निर्णय?

त्याचप्रमाणे जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोल्यात ओबीसी महिलांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. जालना आणि लातूर महापालिकेत एससी प्रवर्गातील महिला महापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. महिला महापौर होणार असलेल्या महापालिकांच्या यादीत प्रमुख शहरांचा समावेश आहे. ही शहरे म्हणजे महाराष्ट्राची ग्रोथ इंजिन मानली जात आहे.

एकट्या मुंबई महापालिकेचे बजेट ७४ हजार कोटी रुपयांचे आहे. मुंबईतून महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल मिळतो. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पुणे महापालिका आहे. पुण्याचे बजेट १२ हजार कोटींहून अधिक आहे. नवी मुंबई महापालिका चौथ्या तर नागपूर महापालिका सर्वाधिक बजेट असलेल्या महापालिकांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

Women Mayor in Maharashtra
Mahapalika Mayor News : मुंबईसोबतच ‘या’ महापालिकेच्या महापौर पदाकडे लागलंय संपूर्ण देशाचं लक्ष; भाजपची प्रतिष्ठा पणाला

चारही शहरे महाराष्ट्राच्या विकासात सर्वाधिक हातभार लावतात. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी या शहरांचा चेहरामोहरा बदलण्याचे आव्हान महापालिकांसमोर असणार आहे. या महापालिकांच्या चाव्या आता महिलांच्या हाती असणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com