PM Modi apology video : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. विरोधकांवर हल्ला चढवत ते भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
पंतप्रधानांची सभा म्हटले की, प्रोटोकॉलनुसार त्यांच्या सुरक्षेसाठी प्रचारसभेच्या ठिकाणी तसेच परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे. त्यांची नुकतीच सिलीगुडीमध्ये प्रचारसभा झाली. त्यावेळी स्थानिक पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांचा बंदोबस्त होता. या बंदोबस्तामुळे एका लग्नात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या लक्षात ही बाब आली.
लग्नाची लगबग सुरू असतानाच पंतप्रधान मोदी सिलीगुडीतील मायपेअर टी रिसॉर्टमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या या अनपेक्षित एंट्रीने सर्वांनाच धक्का बसला. खरंतर आपल्या लग्नात नामवंत वऱ्हाडी मंडळी यावेत, अशीच वधू वराची इच्छा असते. पण थेट पंतप्रधानांची हजेरी लागल्याने सर्वचजण भारावून गेले.
श्रेया आणि अक्षय जैन यांचा हा विवाहसोहळा होता. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये ते नवविहारित जोडप्याची माफी मागताना दिसत आहे. आपल्यामुळे तुमची अडचण झाली असेल, असेही ते म्हणताना दिसत आहेत. पंतप्रधानांनी या जोडप्याला आशीर्वादही दिले.
पंतप्रधान मोदींनी हात जोडताच उपस्थितांनी मात्र काहीही त्रास झाला नाही, असे सांगत काहींनी मोदी-मोदी म्हणण्यास सुरूवात केली. तर काही जण हा क्षण कॅमेरात टिपण्यासाठी झटत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. भाजपनेही सोशल मीडियात हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
भाजपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिलिगुडीमध्ये एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी यांनी स्वतः नवविवाहित श्रेया आणि अक्षय यांची माफी मागितली, कारण त्यांच्या भेटीदरम्यान सुरक्षेमुळे त्यांच्या विवाह सोहळ्यावर परिणाम झाला होता. एक छोटासा क्षणही खूप काही सांगून जातो. प्रत्येक नागरिकाच्या खास क्षणांचा आदर देणारा आणि त्यांना महत्त्व देणारा नेता, असे भाजपने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.