Election news : पठ्ठ्याने भाजप, काँग्रेससह तीन कट्टर विरोधी पक्षांकडून मिळवली उमेदवारी; एका मतदारसंघात झाला मोठा खेळ, सगळेच चक्रावले...

Bharat Singh Wakhla, Gujarat local elections : भरत सिंह वाखला यांनी तिन्ही पक्षांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे संपूर्ण गुजरात राज्यात या उमेदवारीची चर्चा रंगली आहे.
Congress wins Telangana
Congress wins TelanganaSarkarnama
Published on
Updated on

Political news India : स्थानिक स्वराज्य संस्था असो की आमदार, खासदाराची निवडणूक... नेते, कार्यकर्त्यांकडून प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी जीवाचं रान केलं जातं. निवडणुकीत आपल्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने काही इच्छूक बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतात. तर काही जण पक्षनिष्ठा कायम ठेवत बंड टाळतात. पण गुजरातमधून एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे.

गुजरातमध्ये हा प्रकार घडला आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दाहोद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाच उमेदवाराला तीन राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पीपेरो या वॉर्डमधून स्थानिक नेते भरत सिंह वाखला यांना भाजपसह काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही उमेदवारी दिली आहे.

वाखला यांनी तिन्ही पक्षांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे संपूर्ण गुजरात राज्यात या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. सर्व राजकीय पक्षांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीकडे वाखला यांना एकच उमेदवारी अर्ज अंतिम करावा लागणार आहे. ते कोणत्या पक्षाचे उमेदवारी असतील, हे छाननीनंतर स्पष्ट होईल.

Congress wins Telangana
Vishwas Nangre Patil news : माझा भाऊ इथं ‘आयजी’ आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही! IPS विश्वास नांगरे पाटील झाले भावुक

तिन्ही पक्षांशी कनेक्शन

वाखला यांनी मागील विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या तिकीटावर लढविली होती. भाजपच्या उमेदवाराविरोधात त्यांनी चांगली टक्कर दिली होती. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यात त्यांना तिन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

पीपेरो वॉर्डामध्ये एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन आणि आपचा एक उमेदवारी अर्ज आहे. या तिन्हीमध्ये वाखला यांचा अर्ज आहे. त्यामुळे कागदोपत्री सध्या वाघला हे तिन्ही पक्षांचे उमेदवार आहेत.

Congress wins Telangana
Mumbai High Court : IAS तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान; ‘त्या’ शासन आदेशाला स्थगिती

स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीचे संपूर्ण चित्र १५ एप्रिलला स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि राजकीय पक्षांचा अधिकृत उमेदवारांसाठीचा फॉर्म बी सादर झाल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल. ज्या पक्षाचा अधिकृत फॉर्म असेल, त्या पक्षाची उमेदवारी अंतिम होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com