Narendra Modi News : "देश आता छोट्या स्वप्नांवर चालणारा उरलेला नाही. जर भारताला जगात महान राष्ट्राचा दर्जा मिळवायचा असेल, तर आपल्याला भव्य स्वप्ने पाहावीच लागतील आणि ती पूर्ण करण्यासाठी दृढ संकल्प करावा लागेल," अशा आक्रमक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी 'विकसित भारत २०४७' चा नवा संकल्प मांडला.
ते म्हणाले, 'भारताने एक मोठे स्वप्न आणि दृढ संकल्प केला आहे. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा २०४७ मध्ये आपण 'विकसित भारत' बनवून दाखवू.'
'कोणतेही राष्ट्र दुसऱ्याच्या कुबड्यांवर नाही, तर स्वतःची स्वप्ने, स्वतःचा संकल्प आणि स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावरच महान बनते आणि आपली ध्येये साध्य करू शकते.देश आता छोट्या स्वप्नांवर चालणारा नाही आपल्याला मोठी स्वप्ने पाहावी लागतील, कारण मोठी स्वप्ने आपल्या विचारांची क्षितिजं विस्तारतात.', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
गेल्या १२ वर्षांतील प्रगतीचा लेखाजोखा मांडताना पंतप्रधान म्हणाले की, दलित, पीडित, वंचित, आदिवासी, शेतकरी, गरीब, मध्यमवर्ग, महिला आणि युवा देशाच्या प्रत्येक घटकाने राष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे. याच सांघिक प्रयत्नांचे फलित म्हणजे गेल्या १२ वर्षांत २५ कोटी देशवासी गरिबीच्या चक्रातून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत.
गेल्या १२ वर्षांच्या काळात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे . देश मोठ्या स्वप्नांसह स्वतंत्र झाला होता, परंतु आपण अपेक्षित गती व वेग पकडू शकलो नाही . होते, चालते, होईल, पाहिले जाईल, या मानसिकतेतच आपण अडकून राहिलो. २०१४ पर्यंत संपूर्ण जगाने भारताला कमकुवत पाच अर्थव्यवस्थांचा गटमध्ये ढकलले होते.गेल्या १२ वर्षांत भारताने नवीन वेग पकडला असून देश वेगाने पुढे जात आहे.आता १४० कोटी देशवासीयांचा संकल्प आणि सामर्थ्य रोखणे अशक्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.