Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान-गृहमंत्री हरवलेत..., संजय राऊतांचा संताप; संसद थेट Insta-Twitter वर चालवण्याचा सल्ला!

Sanjay Raut Slams PM & Home Minister : संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर जोरदार टीका करत संसद थेट Insta-Twitter वर चालवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर टीका केली. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होत नसल्याचा आरोप करत त्यांनी, "देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवलेत. संसद चालवायची नसेल तर ती थेट Insta आणि Twitter वर चालवा," असा टोला लगावला.

अमित शाह यांनी गृहमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचा दावा करत राऊत म्हणाले, "देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का याच आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील."

Sanjay Raut
Chhagan Bhujbal : भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा... नाशिकच्या चौकाचौकात लागले होर्डिंग, भरपावसात राजकारण पेटलं

आंदोलनाला असंवैधानिक म्हणणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. "घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतंही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही," असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. भारतीय संविधानाचा अपमान करणारी भाषा वापरणे चुकीचे असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत राऊत म्हणाले, "या देशातला तरुण वर्ग जंतरमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला. ज्याच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याचा राजीनामा मागणं हे घटनाबाह्य आहे असं कोणाला वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल."

Sanjay Raut
KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस? शिवसेना पदाधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत नवे राजकीय समीकरण

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. "राम मंदिरासाठी हिंदूंनी सगळ्या बलिदान केलं. फक्त संघाने किंवा भाजपने नाही. तिथे 550 कोटींची दानपेटी चोरीला जाते, त्यावर आवाज उठवणाऱ्यांवर हल्ले होतात आणि त्याचं समर्थन केलं जातं, हे अत्यंत गंभीर आहे," असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com