PM Narendra Modi in Nagpur Sarkarnama
देश

PM Modi in Nagpur : पंतप्रधान मोदींनी कागदावर उतरवल्या भावना; म्हणाले, संघाच्या या भक्कम स्तंभांचे...

Rashtriya swayamsewak Sangh Nagpur News : डॉ. हेगडेवार स्मृती भवनाला भेट दिल्यानंतर त्यांनी येथील नोंदवहीत आपल्या भावना लिहिल्या आहेत.

Rajanand More

Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.30) नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट दिली. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आरएसएस मुख्यालयात आले होते.

डॉ. हेगडेवार स्मृती भवनाला भेट दिल्यानंतर त्यांनी येथील नोंदवहीत आपल्या भावना लिहिल्या आहेत. ‘आरएसएस’कडून सोशल मीडियात पंतप्रधानांच्या या संदेशाचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी पंतप्रधानांसोबत सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष भय्याजी जोशी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, परम आदरणीय डॉ. हेडगेवारजी आणि आदरणीय गुरुजींना विनम्र अभिवादन. त्यांच्या आठवणी जपत या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आरएसएस कार्यालयात आले आहेत.

भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनात्मक शक्ती या मूल्यांना समर्पित असलेले हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेत पुढे जाण्याची प्रेरणा देते. संघाच्या या दोन भक्कम स्तंभांचे हे स्थान देशसेवेसाठी समर्पित असलेल्या लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जास्रोत आहे. आपल्या प्रयत्नांनी भारतमातेचा अभिमान सदैव वाढू दे, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आऱएसएस कार्यालयाला भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवान केले. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते आरएसएसच्या माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी झाली.

पंतप्रधान मोदी गुढीपाडव्यादिवशी पहिल्यांदाच नागपुरात आल्याने त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात शहरात अनेक ठिकाणी चौकांचौकात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. एक है तो सेफ है असे फलकही लावण्यात आले आहेत. निवडणूक प्रचार, शासकीय कार्यक्रमांनिमित्त पंतप्रधान अनेकदा नागपुरात येऊन गेले आहेत. पण भाजप आणि आरएसएससाठी आजचा दिवस खास ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT