Shiv Sena Politics Maharashtra : ठाकरे-शिंदे शिवसेना एकत्र येण्याच्या 'मुहूर्ता'ची चर्चा; होळीनंतर गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत संकेत?

Gudipadwa Mumbai Dombivli Kalyan Thackeray Shiv Sena Dipesh Mhatre MP Shrikant Shinde : मुंबई डोंबिवली कल्याण गुढीपाडवा शोभायात्रेत ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे अन् शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
eknath shinde uddhav thackeray 1
eknath shinde uddhav thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Gudipadwa Festival Procession : हिंदू नववर्षाची सुरवात आज गुढीपाडव्यानं सर्वत्र झाली. राज्यभरात यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण असून, शोभायात्रा काढल्या गेल्या आहे. मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली भागात राजकीय अन् सामाजिक संघटनांनी शोभायात्रा काढून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

डोंबिवली इथं काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे स्थानिक नेते एकत्र आले होते. ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे शोभायात्रेत पहिल्यांदाच एकत्र येत शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीत दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते एकत्र येण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वेगळेच राजकीय संकेत मिळत असल्याची चर्चा आहे.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली इथं गुढीपाडव्यानिमित्ताने विविध मंडळांनी शोभायात्रा काढल्या आहेत. या शोभायात्रांना स्थानिक नेते मंडळी भेट देऊन शुभेच्छा देत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे भेट देऊन शुभेच्छा देत होते. याचवेळी ठाकरे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे देखील या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले.

eknath shinde uddhav thackeray 1
Shiv Sena vs Kunal Kamra : 'टीका हा लोकशाहीचा आत्मा, हे मोदींचे म्हणणे शिंदेंना मान्य नाही का?' काँग्रेसच्या सपकाळांनी महायुतीला दाखवला आरसा

खासदार श्रीकांत शिंदे आणि दीपेश म्हात्रे एका शोभायात्रेत समोरासमोर आले. तशी या दोघा नेत्यांची पहिलीच भेट होती. या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. खासदार शिंदेंनी म्हात्रेंच्या शुभेच्छा स्वीकारत काही चर्चा केल्या. दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांची ओळख खासदार शिंदेंना करून दिली. यामुळे वातावरण अधिकच खुलले. दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते एकत्र आल्याने शोभायात्रेतील वातावरण अधिकच उत्साही झाले होते.

eknath shinde uddhav thackeray 1
Central Government Food Security Scheme : कर्नाटकमधील तीन खासदारांमध्ये रंगला वाद; उपराष्ट्रपती धनखड म्हणाले...

या नववर्षाच्या स्वागत शोभायात्रेतील हिंदूंना शुभेच्छा देण्यासाठी मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. गणपती मंडळाकडून यांचे देखील स्वागत करण्यात आले. आजच्या दिवस कोणावरती टीका करणार नाही. मात्र चांगले काम करतील ही अपेक्षा आहे, असे सांगून जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.

गुढीपाडव्यापूर्वी होळी सणाला देखील डोंबिवलीत ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र आले होते. स्थानिक नेत्यांनी एकत्र येत गावातील मानाची होळी पेटवली होती. आता पुन्हा हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते एकत्र आल्याने, साधलेल्या मुहूर्ताची चर्चा राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com