Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi On Dynastic Politics : भाजपमधील 'घराणेशाही' पंतप्रधान मोदी संपवणार ; विद्यमान मंत्र्यांची तिकीट कापणार ?

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : पुढील काळात होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचा मेगा प्लॅन तयार आहे. भाजपने रणनीती आखली असून, पक्षातल्या घराणेशाहीला पंतप्रधान मोदी यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नेत्यांच्या सर्वच मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही, त्याऐवजी महिला आणि युवकांना उमेदवारी देण्याचा मोदींचा प्राधान्य असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक संमतीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत लोकसभेसह आगामी काळात पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यसभेचे सदस्य असलेले काही केंद्रीय मंत्र्यांना उतरविण्याची तयारी सुरु आहे. त्यांच्यासाठी सेफ मतदारसंघ निवडले जात असून, याबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नेत्यांच्या सर्वच मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही, त्याऐवजी महिला आणि युवकांना उमेदवारी देण्याचा मोदींचा प्रयत्न असणार आहे. त्यासोबतच सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांची लोकसभेसाठी तिकीट कापली जाणार असून, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, अशी माहिती सूत्रांने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT