NCP News : नवाब मलिक यांनी राजकीय संकेत दिलेच नाहीत !

NCP Minister Chhagan Bhujbal meets Nawab Malique in Mumbai-अजितदादा पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली नवाब मलिक यांची भेट
Nawab Malique & Chhagan Bhujbal
Nawab Malique & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal & Nawab Malique News : वैद्यकीय जामीनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांची आज अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली. मुंबईत मलिक यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत मलिक यांनी काहीही राजकीय संकेत न दिल्याने अजितदादा पवार गटाची निराशा झाल्याचे बोलले जाते. (There is big curiosity about Nawab Malique`s political decision)

मुंबईच्या (Mumbai) राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malique) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर जाणार की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या गोटात जातात याची उत्सुकता आहे.

Nawab Malique & Chhagan Bhujbal
Dada Bhuse News : आम्ही मुख्यमंत्र्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत असतो!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गट विशेष प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ज्येष्ठ नेते भुजबळ यांनी मलिक यांची भेट घेतली. मात्र मलिक यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवल्याने संभ्रम आणखी वाढला.

स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनासाठी मुंबई बाहेर असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ आज मुंबईला परतले. त्यांनी दुपारीच श्री. मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ आणि मलिक यांच्यात काय चर्चा झाली याबाबत दोन्ही गटांकडून काहीही माहिती देण्यात आली नाही.

Nawab Malique & Chhagan Bhujbal
Shivsena News : दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेनेने सुहास कांदेंना कोंडीत पकडले!

श्री. भुजबळ यांनी मलिक यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. या भेटीवेळी काही वेळ हे दोन नेते एकटेच होते. त्यांच्यात काही चर्चा देखील झाल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र राजकीय चर्चा झाली अथवा नाही, याविषयी दोन्ही नेत्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

दरम्यान, मलिक यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री. मलिक यांच्याकडे असलेल्या खात्याचा कारभार काही काळ अन्य मंत्र्याकडे दिला नव्हता. मुंबई शहराचे अध्यक्ष असलेल्या मलिक यांच्या जागेवर नवी नियुक्ती देखील केली नव्हती. या कालावधीत मलिक यांना राजकीय पाठबळ देण्याचे संकेत देण्यात आले होते.

Nawab Malique & Chhagan Bhujbal
Supriya Sule News : साहेब-दादांच्या भेटीत मी नव्हते ; राजकीय विचार वेगळे मात्र, कुटुंब एकच..

मलिक सध्या वैद्यकीय कारणांनी मिळालेल्या जामीनावर आहेत. त्यामुळे त्यांचा जामीनाचा कालावधी पुढे वाढणार की नाही हे अनिश्चित असल्याने सध्या त्यांनी राजकीय भूमिकेवर मौन बाळगणे पसंत केल्याचे बोलले जाते. मात्र मुंबई शहरातील अल्पसंख्यांक समाजाचा एक प्रभावी चेहरा म्हणून मलिक यांना आपल्या गटात खेचण्यासाठी अजितदादा पवार यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. याआधी प्रफुल्ल पटेल व अन्य सहकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com