PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गणेशोत्सावा दरम्यान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीची पूजा केली होती. मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजा करायला गेल्याच्या प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
विरोधकांच्या या टीकेवर मोदींनी गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व प्रकणावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, "आजही सत्तेसाठी भूकेले असलेल्या आणि समाजात फूट पाडण्यात गुंतलेल्या लोकांना गणेश पूजनात अडचणी आहेत.
मी सरन्यायाधीशांच्या (D.Y Chandrachud) घरी गणेश पूजेत सहभागी झाल्यामुळे काँग्रेस (Congress) आणि त्यांच्या इको सिस्टीममधील लोकांना त्रास झाला. समाजात फूट पाडणाऱ्यांना गणेश उत्सवाचीही अडचण आहे." दरम्यान, यावेळी मोदी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा गुन्हा केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, या लोकांनी गणपतीची मूर्ती देखील तुरुंगात ठेवली.
या घटनेमुळे पूर्ण देश अस्वस्थ झाला होता. ही द्वेषपूर्ण विचारसरणी समाजात विष पसरवणारी असून ती आपल्या देशासाठी खूप घातक आहे. त्यामुळे अशा विचारसरणीला आळा घालणे गरजेचे आहे. अशा शक्तींना आपण वाढून द्यायचं नाही, अशा शब्दात मोदींनी (Narendra Modi) विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, आपल्या देशासाठी गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात या उत्सवाचा मोठा वाटा आहे. इंग्रज देशाचे तुकडे पाडण्यात जाती-धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्यात व्यस्त होते. तेव्हा या गणेशोत्सवाने लोकांमध्ये ऐकी प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली असल्याचंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गणेशोत्सवाच्या काळात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेसाठी गेले होते. याची माहिती खुद्द मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. यावेळी मोदींनी मराठमोळा पोशाख परिधान केला होता. मात्र, मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावर विरोधकांनी आक्षेप घेत टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.