Congress High Command : सत्तास्वप्नांमुळे ‘हायकमांड’ मराठी मुलखात

Congress Leaders in Maharashtra : महाराष्ट्राच्या काँग्रेसला दिल्लीतील नेत्यांची तगडी साथ मिळत असल्याचे बघायला मिळाले.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात मोठ्या यशाची मोठी अपेक्षा आहे. आता गरज आहे, ती महाविकासचा एकोपा कायम ठेवण्याची. हा एकोपा बिघडविण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? हे कारण पुरेसे आहे.

या कारणापासून अलिप्त राहण्याचे धोरण काँग्रेसने घेतले आहे. गेल्या पंधरवड्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी या ना त्या कारणांनी महाराष्ट्रात हजेरी लावली. महाराष्ट्राच्या काँग्रेसला दिल्लीतील नेत्यांची तगडी साथ मिळत असल्याचे बघायला मिळाले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम यांच्या ''लोकतीर्थ'' या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील नव्या-जुन्या काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली.

Congress
Delhi New CM Atishi : 'माझं अभिनंदन करू नका, आज मी खूप दुःखी' ; मुख्यमंत्रिपदी निवड होवूनही आतिशी आहेत नाराज!

या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसने (Congress) ‘हम सब एक है’चा मेसेज कार्यकर्त्यांना दिला. या कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, खासदार छत्रपती शाहू महाराज, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, सीडब्ल्यूसीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमातून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक मेसेज गेला आहे.

वांगी (जि. सांगली) येथील कार्यक्रमाशिवाय प्रभारी रमेश चेन्नीथला, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी गेल्या आठवड्यात मुंबईसह राज्याच्या इतर भागाचे दौरे केले आहेत. या दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळालेला आत्मविश्‍वास आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यासाठी प्रदेश काँग्रेसला दिल्लीतील नेत्यांची चांगली साथ मिळत आहे. राजकोट (जि. सिंधुदुर्ग) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली, या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय दिसले.

या सोबतच मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नूकसान, पंचनामे व भरपाईची मागणी यासाठीही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते प्रशासनाकडील पाठपुरावा असो की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी यासाठी सक्रिय झाल्याचेही दिसले.

Congress
AAP on Swati Maliwal : 'जराही लाज असेल तर..' ; आम आदमी पार्टीचा स्वाती मालिवाल यांच्यावर जोरदार पलटवार!

गरज महाराष्ट्रव्यापी होण्याची -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी(NCP) सोबतच्या आघाडीतून १४७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ४४ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. या ४४ जागांमध्ये मुंबई परिसरात ४, विदर्भात १५, मराठवड्यात ८, पश्‍चिम महाराष्ट्रात १२, उत्तर महाराष्ट्रात ४ आमदार विजयी झाले.

कोकण व ठाणे परिसरात काँग्रेसचा एकही आमदार विजयी झाला नाही. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्याच्या सर्वच भागात यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रव्यापी होण्यासाठी मित्रपक्षांसोबत जागावाटपात तडजोड करावी लागणार आहे.

मुंबई, कोकण व ठाणे परिसरात अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत कसा व कोणता तह करतात? यावर काँग्रेसची महाराष्ट्रव्यापी होण्याची वाटचाल अवलंबून असणार आहे.

मतदारांपर्यंत पोचणार कसे? -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या वचनपुर्ती मेळाव्यातून महायुती सरकार मतदारांपर्यंत पोहोचत आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

या उपक्रमामुळे पक्षिय यंत्रणा, संघटना, कार्यकर्ते सक्रिय होतात, वातावरण निर्मिती होते. काँग्रेस पक्षीय यंत्रणा सक्रिय करण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी असाच एखादा उपक्रम राबविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. सध्या ज्या ठिकाणी आमदार आहेत, त्या ठिकाणी तरी आपण असे उपक्रम राबवावेत, याबाबत चाचपणीही सुरू असल्याचे समजते.

काँग्रेसकडे आलेले इच्छूकांचे अर्ज -

उत्तर महाराष्ट्र - १४१

विदर्भ - ४८५

मराठवाडा - ३२५

कोकण - १२३

पश्चिम महाराष्ट्र - ३०३

मुंबई - २५६

एकूण - १६३३

u विधानसभेसाठी इच्छूकांचे मोठ्या संख्येने अर्ज

u काँग्रेसपूढे महाराष्ट्रात एकोपा टिकविण्याचे आव्हान

u काँग्रेसच्या ‘हायकमांड’कडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष

u मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंर्क अभियानाचा अभाव

u मुख्यमंत्रिपद चेहऱ्याच्या वादात न पडण्याचे आदेश

u राज्यातील नेते एकत्रित येत असल्याचे आशादायक चित्र

u ठाकरे, पवार यांच्या पक्षांकडून अधिकाधिक लाभ घेण्याचा प्रयत्न

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र -

निवडणूक वर्ष - काँग्रेस - राष्ट्रवादी

१९९९ - स्वतंत्र - स्वतंत्र

२००४ - १५७ - १२४

२००९ - १७४ - ११४

२०१४ - स्वतंत्र - स्वतंत्र

२०१९ - १४७ - १२१

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com