Sonam Wangchuk News : जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेले. या प्रकारामुळे जंतर मंतरवर आंदोलकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. अभिजित दीपके यांना देखील पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता पोलिसांनी या कारवाईचे समर्थन करत वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून का घेऊन गेले, याचे कारण सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.'
'आंदोलकांनी नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला परंतु पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि सुरक्षितरित्य काम पूर्ण केलं. ', असे देखील पोलिसांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. दरम्यान, सफरगंज रुग्णालयात सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
आंदोलनकांनी सांगितले की, डाॅक्टरांच्या वेशात पोलिस आले. त्यांनी सांगितले की, वांगचुक यांची तपासणी करायची आहे. ते स्टेजवर गेले आणि त्यांनी जाहीर केले की कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही यांना उपचारासाठी घेऊन जात आहोत. त्यांनी जबरदस्तीने वांगचुक यांना उचलून नेले. तेथे असलेल्या स्वयंसेवकांना देखील पोलिसांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.