Union Minister Bishweswar Tudu  Sarkarnama
देश

मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत; पोलिसांनी आवळला फास

मोदी सरकारमधील (Modi Government) आणखी एक मंत्री आता अडचणीत आला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर मोदी सरकारमधील (Modi Government) आणखी एक मंत्री (Union Minister) आता अडचणीत आला आहे. आचारसंहितेच्या काळात त्यांनी दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एका अधिकाऱ्याचा हात मोडला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंत्र्याभोवती कारवाईचा फास आवळला असून पुरावे गोळा करण्यास सुरवात केली आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवले होते. या अटकेवरून मोठा गदारोळ उडाला होता. आता मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू (Vishweshwar Tudu) हे अडचणीत आले आहेत. ते आदिवासी व जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी आचारसंहिता लागू असताना 21 जानेवारीला ओडिशामध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी आता मुद्दा लावून धरला असून, टुडू यांच्या कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी आता टुडू यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यास सुरवात केली आहे. ही घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते तपासण्यात येत आहे. याचबरोबर मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी अहवालही पोलीस तपासत आहेत. तसेच, कॉल रेकॉर्डही पोलिसांनी मिळवले आहेत. मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांचे जबाबही पोलीस तपासून पाहत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजपने मात्र, सत्ताधारी बिजू जनता दल सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला आहे.

टुडू हे ओडिशातील मयूरभंजचे खासदार आहेत. मयूरभंज जिल्ह्यातील बारिपाडा येथील भाजप (BJP) कार्यालयात 21 जानेवारीला बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा नियोजन मंडळाचे सहाय्यक संचालक देवाशिष महापात्रा आणि उपसंचालक अश्विनी मलिक यांना बोलावण्यात आले होते. राज्यात पंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने या बैठकीला हे सरकारी अधिकारी फायली घेऊन गेले नव्हते. यामुळे संतापलेल्या टु़डू यांनी प्लॅस्टिकच्या खुर्चीने अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यात महापात्रा यांचा हात मोडला आहे. (Bishweswat Tudu News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT