फडणवीसांनी तीन वेळा नारळ आपटला अन् विधानसभा अध्यक्ष मैदानात!

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election 2022) भाजपने (BJP) जोरदार प्रचार सुरू केला आहे.
Devendra Fadnavis, Pramod Sawant and Rajesh Patnekar
Devendra Fadnavis, Pramod Sawant and Rajesh PatnekarSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तोंडावर भाजप (BJP) नेते व विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. डिचोली मतदारसंघाचे आमदार असलेल्या पाटणेकरांनी मैदानात उतरण्यास नकार दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली होती. अखेर ते लढण्यास तयार झाले आहेत. पण यासाठी तीन वेळा नारळ आपटावा लागल्याचा खुलासा गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. पाटणेकर यांनी निवडणुकीत उभे न राहण्यासाठी प्रकृतीचे कारण पुढे केले होते. विधानसभा अध्यक्षांनीच निवडणूक लढण्यास नकार दिल्याने भाजपवर नामुष्की ओढवली होती. गोव्याचे प्रभारी या नात्याने पाटणेकरांची समजूत काढण्याची जबाबदारी फडणवीसांवर होती. अखेर यात त्यांना यश आले आहे.

Devendra Fadnavis, Pramod Sawant and Rajesh Patnekar
वाईन विक्रीच्या धोरणावर आठवले म्हणाले, किराणा दुकानात आला दारूचा माल...

अखेर पाटणेकर विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. फडणवीसांनीच पाटणेकरांच्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे. या वेळी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी त्यांना तीन वेळा आपटावा लागला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्या उमेदवाराला तयार करायला थोडा वेळ लागला. त्यामुळे मला तीन वेळा नारळ आपटावा लागला. आता पाटणेकर मैदानात उतरले आहेत. कोणी त्यांच्यासमोर टिकणार नाही, पाटणेकरच निवडून येणार आहे. गोव्यातील सर्वसामान्यांशी जुडलेला नेता अशी पाटणेकरांची प्रतिमा आहे. त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे.

Devendra Fadnavis, Pramod Sawant and Rajesh Patnekar
भाजपच्या मध्य प्रदेशातील दारू धोरण चर्चेत; घरात बार उघडण्यासोबत बरंच काही...

पाटणेकर यांनी 2002 पासून तीन वेळा डिचोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 2012 मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. पाटणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे सरचिटणीस सतीश धोंड यांनी दुसरा उमेदवार शोधण्यास सुरवात केली होती. अखेर पाटणेकर हे लढण्यास तयार झाल्याने भाजप नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गोव्यात विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे तर निकाल 10 मार्चला लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com