Manish Sisodia News
Manish Sisodia News  Sarkarnama
देश

Manish Sisodia News: मनीष सिसोदियांची कॉलर पकडूनच पोलिसांनी न्यायालयात नेलं; केजरीवालांकडून संताप व्यक्त

सरकारनामा ब्यूरो

Delhi News: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सिसोदियांना आज दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

सिसोदिया यांना न्यायालयात हजर करत असताना पोलिसांनी सिसोदियांची कॉलर पकडून नेलं असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया गेल्या काही दिवसांपासून कोठडीत आहेत. आज त्यांना दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र, न्यायालयात घेऊन जात असताना सिसोदियांची पोलिसांनी कॉलर पकडून मानेला धरत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी ट्विट केला असून या प्रकारामुळे केजरीवालांनीही संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, सिसोदिया यांच्याशी अशा प्रकाराचं गैरवर्तन करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी 'आप'च्या नेत्यांनी केली आहे. पोलिसांना सिसोदियांशी अशा प्रकारचं गैरवर्तन करण्याचा अधिकार आहे का?, असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. यावरून आता दिल्लीत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT