Transfers Of Police Officer: राज्य सरकार अॅक्शन मोडवर, दीडशे पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

Maharashtra Police| गेल्या आठ-दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण प्रलंबित होते
DYSP Transfers :
DYSP Transfers : Sarkarnama

DYSP Transfer : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर गेले दहा महिने लटकत असलेली टांगती तलवार नुकतीच दूर केल्यानंतर ते अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी दीडशे एसीपींच्या (डीवायएसपी) बदल्या काल केल्या.तसेच न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या सरकारने तीन वर्षे रखडलेल्या १४३ च्या पीआयंना सुद्धा बढत्यांचा सुखद धक्का दिला. (A major decision by the state government; Transfers of 150 Deputy Superintendents of Police)

DYSP Transfers :
Rahul Gandhi News: उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका; दिलासा देणारा 'तो' निर्णय मागे

सोमवारी (२२ मे) गृह विभागाने १४३ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देऊन सुखद धक्का दिला. तर, मुदत पूर्ण झालेल्या व काहीशा रखडलेल्या १५१ सहाय्यक आयुक्त तथा पोलिस उपअधिक्षकांच्याही बदल्या केल्या. त्यात नक्षलग्रस्त गडचिरोली आणि चंद्रपूर भागातील अधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. तर, इकडच्यांची बदली तिकडे केली आहे. (Police Transfer)

पिंपरी-चिंचवडमधून (PCMC) बदली झालेल्या तीन तरुण एसीपींतील प्रेरणा कट्टे (चाकण) आणि प्रशांत अमृतकर (गुन्हे शाखा) यांची अनुक्रमे चिमूर (चंद्रपूर) आणि गडचिरोलीचे डीवायएसपी म्हणून करण्यात आली आहे.कट्टे यांच्याकडे तळेगाव दाभाडे (ता.मावळ) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी किशोर आवारे यांच्या १२ मे रोजी झालेल्या व मोठी खळबळ उडवून दिलेल्या हाय प्रोफाईल खूनाचा तपास होता. त्यात स्थानिक आमदारांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. त्यांची अचानक बदली झाल्यामुळे या तपासाला काहीशी खीळ आता बसणार आहे.शहरातील तिसरे एसीपी (वाकड) श्रीकांत दिसले यांची नंदुरबारचे डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे.

DYSP Transfers :
PM Modi in Australia : नरेंद्र मोदी आहेत 'बॉस' ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी उधळली स्तुतिसुमने...

बदली झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन एसीपींच्या जागी बाहेरून तीन डीवायएसपी आले आहेत.सातारा ग्रामीणचे विशाल हिरे,अक्कलकोट,सोलापूरचे राजेंद्रसिंह गौर आणि गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआय़डी) पुणे येथील बाळासाहेब यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज शहर पोलिस दलातीलच पीआय विठ्ठल कुबडे यांना बढतीवर शहरातच ठेवण्यात आले आहे. त्यांच्याजो़डीने तीश कसबे हे आणखी एक अधिकारी प्रमोशनवर शहरात आले आहेत.म्हणजे शहरातून बदली झाले तीन एसीपी आणि मिळाले,मात्र पाच आहेत.त्यामुळे काही एसीपींकडील पदभार कमी होणार आहेत. (Maharashtra Police)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com