Pooja Shukla, Akhiesh Yadav sarkarnama
देश

योगींमुळे २६ दिवस कारागृहात गेलेल्या पूजा शुक्ला 'सायकल'वर स्वार

पूजा शुक्ला यांच्यासह बारा विद्यार्थ्यांना योगी सरकारनं अटक करुन त्यांची रवानगी कारागृहात केली होती. २६ दिवसानंतर पूजा शुक्ला यांना जामीन मिळाला होता.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभेच्या पहिल्या टप्यातील मतदानाला आता काही दिवसच बाकी आहे. उत्तरप्रदेशातील (UP Assembly elections 2022) राजकीय वातावरण तापलं आहे. दुसऱ्या पक्षातील बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करीत आहेत. जातीय समीकरणाचा अंदाज घेत उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. (Pooja Shukla News Updates)

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना काळा झेंडा दाखविणाऱ्या एका युवतीला समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव (Akhiesh Yadav) यांनी तिकीट दिलं आहे. पूजा शुक्ला (Pooja Shukla) असे या युवतीचं नाव आहे. पूजा शुक्ला यांना लखनैा उत्तर मतदार संघातून सपानं उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी अभिषेक मिश्रा यांचे तिकीट सपानं कापलं आहे. या ठिकाणची लढत चुरशीची होणार आहे.

सपाच्या उमेदवार पूजा शुक्ला यांची लखनैा विद्यापीठातील विद्यार्थी नेता अशी ओळख आहे. त्या डाव्या विचारसरणीच्या आहेत. त्यांनी एक विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर लखनैा विद्यापीठातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जात असताना पूजा शुक्ला यांनी त्यांना काळा झेंडा दाखविला होता. याप्रकरणी पूजा शुक्ला यांच्यासह बारा विद्यार्थ्यांना योगी सरकारनं अटक करुन त्यांची रवानगी कारागृहात केली होती. २६ दिवसानंतर पूजा शुक्ला यांना जामीन मिळाला होता. या दरम्यान पूजा शुक्ला या चर्चेत आल्या होत्या.

लखनैा विद्यापीठात दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर पूजा यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज विद्यापीठात नामंजूर केला होता. त्यानंतर पूजा यांनी विद्यापीठाच्या आवारात दोन महिने आंदोलन केलं होतं. समाजवादी पक्ष विद्यार्थी विभागाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी पूजा शुक्ला यांनी पदभार सांभाळला आहे. योगी सरकारच्या धोरणाविषयी पूजा या नेहमीच आवाज उठवीत असतात. आंदोलनात पोलिसांच्या लाठीहल्लात त्या जखमी झाल्या आहेत.

अभिषेक मिश्रा हे २०१२ मध्ये लखनैा उत्तर विधानसभा मतदार संघातून विजयी झाले होते. ब्राह्मण मतदारांच्या पाठिब्यांवर त्यांनी कॉग्रेसच्या नीरज बोरा यांचा पराभव केला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री केलं होते. दरम्यान नीरज बोरा हे भाजपमध्ये गेले त्यांनी २०१७च्या निवडणुकीत अभिषेक मिश्रा यांचा पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT