Waris Pathan News Updateds
Waris Pathan News Updatedssarkarnama

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना मुस्लिम युवकानं काळं फासलं

पठाण हे दग्यार्तून बाहेर येत असतानाच हा प्रकार घडला. हल्लेखोर युवकाला पकडण्याचाही प्रयत्न झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Published on

इंदूर: मध्यप्रदेशमधील आगामी निवडणुका लढण्यासाठी एमआयएम जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. त्यासाठीच एमआयएमच्या प्रमुख नेत्यांचे मध्य प्रदेश दौरे वाढले असून वारिस पठाण हेसुद्धा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. वारिस पठाण ( Waris Pathan) हे सातत्याने वादग्रस्त विधाने करीत असतात, असेच विधान त्यांनी नुकतेच केले. त्यांना अद्दल घडविण्यासाठी एका मुस्लिम युवकांना त्यांना काळे फासले. यावेळी एमआयएमचे (MIM) कार्यकर्ते घटनास्थळी आक्रमक झाले होते. (Waris Pathan News Updateds)

वारिस पठाण हे मंगळवारी इंदूर येथील खरजाना भागात काला खरजाना दर्गा येथे (नाहर शहा वली सरकार की दरगाह ) चादर अर्पण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. वारिस पठाण यांच्या विधानामुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होत असल्याचे त्यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी या युवकाने त्यांना काळे फासल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पठाण हे दग्यार्तून बाहेर येत असतानाच हा प्रकार घडला. हल्लेखोर युवकाला पकडण्याचाही प्रयत्न झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सद्दाम पटेल (वय ३२) असे त्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सद्दामला अटक केली आहे. सद्दाम हा चहाच्या किटलीचे काळे हाताला लावून आला होता. गर्दीचा फायदा घेत तो पठाण यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांच्या चेहऱ्यावर हाताचे काळे फासले. सद्दामची जामिनावर सुटका झाली आहे.

Waris Pathan News Updateds
खाकी टोपी फेकून लाल टोपी परिधान ; भाजपच्या त्रासाला कंटाळून सपामध्ये प्रवेश

अशी घटना घडली नसल्याचा दावा वारिस पठाण यांनी केला आहे. ''एमआयएमवर जनतेचं प्रेम आहे. एमआयएमला अनेक ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. एका लहान मुलाने मला काळे तीट लावले, असे पठाण यांनी म्हटलं आहे. या घटनेमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.

यापूर्वीही सीएए/एनआरसी बाबत पठाण वादग्रस्त विधान केले होते. ''१५ कोटी मुस्लिम १०० कोटी हिंदूंना भारी पडतील,'' असं विधान त्यांनी केलं होते. यावरुन मोठा वाद झाला होता. वारिस पठाण हे मुंबईतील भायखळा येथील एमआयएमचे माजी आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com