पाटणा : देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Positive) वाढत आहे. काही राज्यात अधिकृतपणे तिसऱ्या लाटेची (Covid-19 Third wave) घोषणा झाली आहे. बिहारमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोनाने आता थेट बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य केले आहे. आज एकाच दिवसात मुख्यमंत्री नितीश कुमार (nitish Kumar) यांच्या घरातील तब्बल ४० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
या सोबतच बिहार सरकारमधील तारकिशोर प्रसाद सिंह आणि रेणु देवी या उपमुख्यमंत्र्यांसह अन्य ३ मंत्री देखील बाधित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी नितीश कुमार यांच्या जनता दरबारमधील ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट नितीश कुमार यांच्या घरात काम करणाऱ्या ४० कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान बिहारमध्ये डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात आतापर्यंत तब्बल २१८ डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मागच्या काही दिवसांपुर्वी याच ठिकाणी ७२ डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह सापडले होते. त्यापुर्वी ८७ डॉक्टरांना बाधा झाली होती. तर आज ५५ पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
मागच्या काही दिवसात बिहारमध्ये ८९२ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. केवळ पाटणा जिल्ह्यात ५६५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २४ तासात पॉजिटिव्हिटी रेट तीन पट वाढला आहे. या सगळ्यावर खबरदारीचा उपाय म्हणून नितीश कुमार सरकारने नाईट कर्फ्यू आणि अन्य काही निर्बंधांची घोषणा केली आहे. गुरुवारपासून हे आदेश लागू होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.