Loudspeaker
Loudspeaker Sarkarnama
देश

मशिदींवरील भोंग्याचा वाद चिघळण्याची शक्यता; 'अजान'ची तुलना केली 'अखंड पाठा'बरोबर

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : मशिदींवरील (Mosque) लाऊडस्पीकरचा आवाज व त्यामुळे होणाऱ्या कथित ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा तापत चालला असून मुस्लिम धर्मगुरूंतर्फे अजानची तुलना अखंड पाठ म्हणजेच भजन-कीर्तन नामसप्ताहाबरोबर केली गेली आहे. '२-३ मिनीटांत संपणाऱ्या 'अजान' मुळे ध्वनीप्रदूषण होते, अशी तक्रार करणारे २४ तास चालणाऱ्या अखंड पाठामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाकडे (Noise pollution) पहात नाहीत, हे आश्चर्य आहे, असे मत सुन्नी उलेमा परिषदेचे महासचिव हाजी मोहम्मद सालीस यांनी व्यक्त केले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यांत मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वातावरण तापविले जात आहे. यावर्षीच्या अखेरीस निवडणुका होणाऱ्या गुजरातेत हा मुद्दा २००१ नंतर वारंवार चर्चेत आलेला आहे. दिल्लीतील भाजपच्या महापौरांसह खासदार प्रवेश वर्मा व इतर भाजप नेत्यांनी चैत्री नवरात्रीत मासविक्रीच्या दुकांनावर बंदी घालण्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात संघाच्या पथसंचालनावर पुष्पवृष्टी केल्याने, भाजपचा झेंडा घरावर लावल्याने किंवा भाजपचा प्रचार केल्याने अनेक उच्चसिक्षित मुस्लिम तरूणांना कट्टरपथीयांकडून धमक्या मिळण्याचे प्रकार वाढले आहेत.

हाजी सालीस यांनी या वादात उडी घेताना अजानची तुलना अखंड पाठाबरोबर केल्याने यावरील वाद तापण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. कर्नाटकातील ३०० हून जास्त मशिदींना लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेत ठेवण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. हाजी सालीस म्हणाले की देशाला द्वेष व घृणेच्या वातावरणात डकलण्याचे प्रकार सुरू असून ते योग्य नाहीत. वातावरण इतके बिघडले आहे की तुम्ही टोपी घालता, दाढी ठेवता किंवा हिजाब परिधान करता तर काही लोकांना अडचण वा समस्या वाटू लागली आहे. या मुद्यावरून जमावाकडून हल्ले होऊन लोकांचे जीव जातात. आम्ही काय खातो याचीही चर्चा होते. असा गोष्टींवर तकी चर्चा सुरू होणे हे अनाकलनीय आहे. हे भितीदायक वातावरण आहे. शतकानुशतके भारतातील प्रत्येक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत. पण सध्या वातावरणातील सलोखा धोक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न का सुरू आहेत ते समजायला मार्ग नाही. राजकारण त्याच्या ठिकाणी असावे, त्यात धर्माला ओढले जाणे योग्य नाही. मशिदींतील अजान किती वेळाची असते तर ती २ ते ३ मिनीटांत संपते. मात्र जेव्हा मोठ्या आवाजांत लाऊडस्पीकर लावून २४ तास अखंड पाठासारखे कार्यक्रम होतात तेव्हा त्यात यंना ध्वनीप्रदूषण दिसत नाही. हा द्वेष पसरविणाऱ्या शक्तींच्या विरोधात लोकांनाच पुढे यावे लागेल, असेही त्यांनी आवाहन केले.

दरम्यान मशिदींवरील आवाज मर्यादित कक्षेत ठेवण्यासाठी एक डिव्हाईस लावण्याच्या सूचना दिल्याचे जामा मशिदीचे इमाम मोहम्मद इमरान राशदी यांनी नमूद केले. रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना रोज दोन तास कामावरून सुटी देण्याचा वादग्रस्त आदेश दिल्ली सरकारच्या जल मंडळाने माघारी घेतला आहे. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. रमजानच्या महिन्यात जल मंडळाच्या मुस्लिम सर्व कर्मचाऱ्यांना रमजानचा महिनाभर कार्यालयीन वेळेत प्रतीदिन दोन तासांची पगारी सुटी दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र भाजपने याविरूध्द दिल्लीभर प्रदर्शने सुरू करताच दिल्लीतील आप सरकारने २४ तासांच्या आत यू टर्न घेऊन तो आदेशच आज रद्द केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT