मी जे राऊत यांच्याविषयी वारंवार सांगत होतो... तसेच घडले

Shivsena|BJP|Chandrakant Patil|Sharad Pawar : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama

कोल्हापूर : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून आता स्पष्ट झाले आहे, असा टोला भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरुवारी (ता.7 एप्रिल) लगावला. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व शहराध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

Chandrakant Patil-Sanjay Raut
'सामना' कार्यालयात धमकावून राऊतांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले...

पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक तुरुंगात गेले. परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली. तर केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांवर कारवाया केल्या मात्र त्यावेळी शरद पवारांना पंतप्रधानांना भेटून हा अन्याय आहे व तो थांबवा, असे सांगायचे सुचले नाही. इतरांच्या बाबतीत निरीच्छ असणारे पवार मात्र राऊतांच्या गळ्याशी प्रकरण आल्यानंतर मोदीजींची भेट घेतात. याच्यावरूनच आपण राऊतांविषयी जे बोलत होतो ते स्पष्ट होते.

Chandrakant Patil-Sanjay Raut
अजित पवारच म्हणाले, राष्ट्रवादीचेही आमदार नाराज

याबरोबरच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी लोकांना आवडतील अशा योजनांचा उल्लेख करायला सुरुवात केली आहे. त्यातून ते पाईपलाईनच्या योजनेच्या चाचणीचे वेळापत्रक जाहीर करत आहेत. परंतु, हे केवळ निवडणुकीसाठी आहे. लबाडाच्या घरचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, असा जोरदार टोलाही पाटलांनी सतेज पाटलांना लगावला.

ते म्हणाले, शाहू मिलमध्ये शाहू स्मारक उभारण्याचा विषय पालकमंत्र्यांना आता आठवला आहे. पण सत्तेमध्ये असताना गेली सव्वादोन वर्षे त्याना याबाबतीत काम करण्यास कोणी रोखले नव्हते. निवडणुकीत चुरस असली तरी भाजपा नक्की निवडणूक जिंकेल. पराभवाच्या भितीने दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ध्यानात घ्यावे की बॉल जितका आपटावा तितका तो उसळून वर येतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Chandrakant Patil-Sanjay Raut
वसंत मोरेंना सुनावत मुस्लिम पदाधिकाऱ्याकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल टीका करण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यात या दोन्हीवरील व्हॅट कमी करण्यास सांगावे. देशातील २२ राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात नागरिकांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातही कर कमी केल्यामुळे कमी दर आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर कोथरूड मतदारसंघात आपल्याबद्दल रात्री पोस्टर लाऊन पळून जाण्यापेक्षा हिंमत असेल तर समोर येऊन विकासकामांबद्दल जाहीर चर्चा करा. आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि पुण्यासाठी काय काम करत आहोत, हे लोकांना माहिती आहे, असे आव्हानही पाटलांनी विरोधकांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com