DK Shivakumar, CM Siddaramaiah Sarkarnama
देश

DK ShivaKumar : कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा टशन; शिवकुमारांसाठी सिध्दरामैय्या सोडणार पद?

Karnataka CM Siddaramaiah DK Shivakumar Vokkaliga : कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेस सत्तेत आल्यानंतर डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदासाठी मोठ दावेदार होते.

Rajanand More

Karnataka : कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री सिध्दरामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील राजकीय टशन समोर आली आहे. वोक्कालिगा समाजाच्या प्रतिष्ठित धार्मिक नेत्यानंच थेट शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

वोक्कालिगा समाजाचे धार्मिक नेते चंद्रशेखर स्वामीजी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पद सोडण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात सिध्दरामैय्या यांच्यासह शिवकुमारही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासमोर स्वामींनी शिवकुमार यांच्यासाठी खुर्ची रिकामी करण्यास सांगितल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कार्यक्रमात बोलताना स्वामी म्हणाले, मुख्यमंत्रिपदावर काम करण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. पण शिवकुमार यांना ही संधी मिळालेली नाही. त्यामुळे सिध्दरामैय्या यांनी शिवकुमार यांच्यासाठी पद सोडून त्यांचा मार्ग मोकळा करावा.

शिवकुमार यांनी मात्र स्वामींच्या या विधानावर सावध भूमिका मांडली आहे. लोकांना आपली मतं मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. असे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात, असे शिवकुमार यांनी सांगितले. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाचे मोठे दावेदार होते.

चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर दिल्लीत सिध्दरामैय्या यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आले. सिध्दरामैय्या अडीच वर्षानंतर पदाचा राजीनामा देऊन शिवकुमार पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्री असतील, अशीही चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT