PM Kisan Yojana Sarkarnama
देश

PM Kisan Samman Nidhi Yojana: सरकारी, भाडे पट्ट्यावरील जमिनीवर शेती करणाऱ्यांना लाभ मिळतो का?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते.

Mayur Ratnaparkhe

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana Benefit News : या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांशी निगडीत अनेक योजनाही राबवत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात जमा केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

किसना सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशाच्या 13 कोटी पेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली आहे. आता प्रश्न हा आहे की, या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांनाही मिळतो का, की जे सरकारी किंवा भाडे पट्ट्यावर घेतलेल्या जमिनीवर शेती करतात?

शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत, केवळ त्या लहान शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते, ज्यांच्या नावावर शेतजमीन रजिस्टर्ड असते. भाडेतत्वावर जमीन घेवून शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतात. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, याच्या माहितीसाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्रता तपासून बघू शकतात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी(PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेच्या १९व्या हप्त्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी २०२५मध्ये १९वा हप्ता जमा केला जाऊ शकतो. तर योजनेसाठी मोठी अपडेट ही आहे की सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याबाबत विचार करत आहे.

प्राप्त माहितीनुसार, या योजनेत ४ हजार रुपयांची वाढ होवू शकते. आतापर्यंत वर्षाला सहा हजार रुपये होती, आता त्यामध्ये वाढ होवून ती १० हजार होवू शकते. असंही बोललं जात आहे की यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत विशेष तरतूद केली जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT