
Mumbai News : फेब्रुवारीत देशाचा अर्थसंकल्प मोदी सरकारकडून सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनट बैठक घेत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत.
मंत्रिमंडळाने 16 हजार 300 कोटी रुपयांच्या नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशनला मान्यता दिली आहे. या निर्णयाचा कृषी क्षेत्रासह देशाला खनिजांच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सने (CCEA) इथेनॉल खरेदीसाठी सुधारित किमतींना मंजुरी दिली. या किमती 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहणार आहेत. देशात इथेनॉलचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
सरकार हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेत आहे. अर्थसंकल्पापूर्वी असाच निर्णय घेत, शेतकऱ्यांना (Farmer) खुशखबर दिली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रोग्रामद्वारे सी-हेवी मोलॅसिस (CHM)ची एक्स-मिल किंमत 56.58 रुपये प्रति लीटरवरून 57.97 रुपये प्रति लीटर झाली आहे. या वाढलेल्या किमतीचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत मिळणार आहे.
सरकारने या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी संपलेल्या 2024-25 कालावधीसाठी सी-हेवी मोलॅसीसमधून मिळणाऱ्या इथेनॉलच्या एक्स-मिल किंमतीत 1.69 रुपयांनी वाढ करून 57.97 रुपये प्रति लिटर करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, उसाचा रस, साखर आणि साखरेच्या पाकापासून उत्पादीत इथेनॉलच्या किमती अनुक्रमे 60.73 रुपये प्रति लिटर आणि 65.61 रुपये प्रति लिटरवर कायम आहेत.
मोदी सरकारने देशातील आणि ऑफशोअर भागातील महत्त्वाच्या खनिजांच्या शोधाला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी दिली. यासाठी 16 हजार 300 कोटी रुपयांच्या नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशनलाही मान्यता दिली. या मोहिमेमुळे देशातील महत्त्वाच्या खनिजांच्या शोधासाठी प्रयत्न अधिक वेगाने होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.