Praful Patel in Rajya sabha Sarkarnama
देश

Rajya Sabha Session : प्रफुल पटेलांनी राऊत अन् प्रियांका चतुर्वेदींना डिवचले; विषय संजयभैय्या, औकातीपर्यंत गेला...

Waqf Bill controversy Praful Patel vs Sanjay Raut Rajya Sabha Debate : राज्यसभेत रात्री उशिरा वक्फ सुधारित विधेयकाला मंजुरी मिळाली. त्याआधी पटेलांनी आपल्या भाषणात विधेयकाचे समर्थन करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केले.

Rajanand More

Maharashtra Politics : वक्फ विधेयकावर चर्चेदरम्यान बुधवारी रात्री राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पटेलांनी खासदार संजय राऊतांवरही बाण सोडले. चर्चेचा विषय औकातीपर्यंत पोहचला होता.

राज्यसभेत रात्री उशिरा वक्फ सुधारित विधेयकाला मंजुरी मिळाली. त्याआधी पटेलांनी आपल्या भाषणात विधेयकाचे समर्थन करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केले. यावेळी सभागृहात प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या. धर्म, संविधानावर बोलताना पटेलांनी बाबरी मशीद, मुंबईतील दंगलीचा मुद्दा काढला.  

पटेल म्हणाले, तुम्ही तर खूप शॉर्टकट घेतले आहेत. आता जे आमचे मित्र इथून बोलून गेले (संजय राऊत), त्यांचे नेते म्हणायचे की बाबरी मशीद कुणी पाडली असेल तर माझ्या शिवसैनिकांनी पाडली आहे. मुंबईत मुस्लिमांचा नरसंहार झाला, दंगल झाली, ती कुणी केली, कुणा करायला लावली? आज तुम्ही विचार करायला हवा की तुम्ही कुणासोबत बसला आहात.

सत्तेसाठी तुम्हीही त्यांच्यासोबत हात मिळवले. तेव्हा तुम्हाला गरीब मुस्लिम, भारताचे संविधान आठवले नाही. आता आठवण येत आहे, असे पटेल म्हणाले. त्यावर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पटेलांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले. तुम्ही गप्प बसा. तुम्ही त्यावेळी दुसऱ्या पक्षात होता. त्यामुळे तुम्हाला इतिहास माहिती नाही. तुम्ही त्या पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, असा टोला पटेलांनी लगावला.

राज्यसभेच्या सभापतींनी प्रियांका यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरही पटेलांनी लगेच आपण राज्यापेक्षाही निष्ठावान आहोत, हे त्यांना दाखवावे लागेल, असा चिमटा काढला. पटेलांच्या या पवित्र्यामुळे प्रियांका चतुर्वेदीही आक्रमकपणे बोलू लागल्या. त्यानंतर मात्र पटेलांनी औकात असा शब्दप्रयोग केला. आम्हाला आमची जागा कळते. आमची जेवढी औकात आहे, जेवढी जागा आहे, त्या हिशेबाने आम्ही चालतो, असे पटेल म्हणाले. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदीही शांत झाल्या.

थोड्या वेळाने सभागृहात खासदार संजय राऊत आले. त्यांच्यावरही पटेलांनी भाष्य केले. आज पहिल्यांदाच आमच्या संजयभैयांचे भाषण नरोवा कुंजरावो होते. नेहमी टाकटाकटाक बोलतात. आज काय बोलू आणि काय नको, असे झाले होते. तुम्ही रंग बदलू नका. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि पुढेही राहील, असे म्हणत पटेलांनी भाषण संपविले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT