Amit Shah : अमित शाहांनी स्वीकारले 260 मृत्यूचे सत्य! राज्यसभेत पहाटे चारला काय घडले?

Amit Shah Confirms 260 Deaths in Manipur : अमित शाहांनी सांगितले की, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी सर्व आमदारांशी चर्चा केली. पण कोणीही सत्ता स्थापन्याच्या स्थितीमध्ये नाही.
Amit Shah
Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

Amit Shah News : लोकसभेनंतर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर करण्यात आले. शुक्रवारी पहाटेपर्यंत यावर चर्चा सुरू होती. मात्र, राज्यसभेत हे विधेयक मंजुर झाल्यानंतर पहाटे चार वाजता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्यासाठीचा संवैधानिक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. पहाटे चार वाजता हा ठराव आवाजी मतदानाने मंजुर करण्यात आला.

अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, सरकारची पहिली चिंता मणिपूरमध्ये शांतता निर्माण करणे ही आहे. मणिपूरमधील वांशिक हिंसाचार प्रकरणात 260 लोक मारले गेले हे आम्ही मान्य करतो. पण सभागृहाला सांगू इच्छितो की पश्चिम बंगालमध्ये निवडणूक हिंचारात जास्त लोक मारले गेले.'

Amit Shah
Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या नागपुरातच गोळीबाराचा थरार! दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने भरबाजारात तरूणाला संपवलं

गेल्या चार महिन्यात मणिपूरमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. फक्त दोन लोक जखमी झाले आहेत, असे देखील अमित शाह यांनी सांगितले. मणिपूरमधील हिंसाचारामागचे कारण सांगताना शहा म्हणाले की, एका जातीला आरक्षण देण्यात आले होते. त्याला दुसऱ्या जातीने विरोध केला. मात्र, त्याला दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यावरून हिंसाचार भडकला. सरकारला मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे विरोधी पक्षाने याचे राजकारण करू नये.

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का?

अमित शाहांनी सांगितले की, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी सर्व आमदारांशी चर्चा केली. पण कोणीही सत्ता स्थापन्याच्या स्थितीमध्ये नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्यात आली आणि राष्ट्रपतींनी ती मान्य केली.

पंतप्रधान मोदींवर टीका

राष्ट्रपती राजवटीचा ठराव मंजुर होण्याआधी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी मणिपूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मणिपूरमध्ये हिंसाचारनंतरही पंतप्रधान मोदींना त्या राज्याला भेट देण्याची संधी मिळाली नाही. सत्ताधारी पक्षावर प्रचंड दबाव होता म्हणून मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. मणिपूरमध्ये भाजपचे डबल इंजिन सरकार पूर्णपणे फेल ठरले.

Amit Shah
Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com