Prajwal Revanna Sarkarnama
देश

Prajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणात ट्विस्ट; महिला आयोगाचा मोठा दावा

Rajanand More

Bengaluru News : कर्नाटकातील खासदार प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणाला (Prajwal Revanna Sex Scandal) वेगळे वळण मिळाले आहे. रेवण्णा हे देशाबाहेर असल्याने त्यांच्या अटकेसाठी कर्नाटक पोलिसांना अडचणी येत आहेत. पण आता राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. रेवण्णा यांच्याविरोधात तक्रार दिलेल्या एका महिलेने आपल्याला तक्रार देण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केल्याचे आयोगाने म्हटले आहे. धमकावल्यामुळे आपण तक्रार दिल्याचे या महिलेने म्हटल्याचा दावा आयोगाने केला आहे.

महिला आयोगाच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, विशेष तपास पथकाकडून (SIT) साक्षीदार आणि पीडितांना धमकावरून त्यांच्याकडून खोटे जबाब लिहून घेतले जात आहेत. काँग्रेस (Congress) सरकारच्या म्हणण्याप्रमाणे जबाब न दिल्यास त्यांना अधिकाऱ्यांकडून धमकावले जात आहे. (Latest Political News)

एसआयटीतील अधिकारी पीडितांच्या घरी जात त्यांना धमकी देत आहेत. अशाप्रकारे तपास सुरू आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. अपहरण झालेल्या महिलेला कुठे ठेवले आहे, तिला कोर्टासमोर का आणले नाही, पीडितांचे खासगी व्हिडिओ पसरवण्यासाठी तुम्ही मदत करत आहात का, असे सवाल कुमारस्वामी यांनी केले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रज्वल रेवण्णाचे समर्थन करणार नाही, असे सांगताना कुमारस्वामी म्हणाले, प्रत्येकाने कायद्याचा मान राखला पाहिजे. दोषींना शिक्षा व्हायला हवी. एच. डी. देवेगौडा यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. मी केवळ विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly Election) हसनमध्ये गेलो होतो. आमच्या प्रत्येकाचे स्वतंत्र कुटुंब आणि व्यवसाय आहेत, असेही स्पष्टीकरणही कुमारस्वामी यांनी दिली.

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी एसआयटी चौकशीचे समर्थन केले. ते म्हणाले, मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही. त्यांची एसआयटीविरोधात तक्रार असेल तर ती दाखल करावी. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अहवाल आल्यानंतर सर्व तथ्य समोर येतील. पीडितांना धमकावले जात असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही परमेश्वरा यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT