Congress News : काँग्रेस नेत्यांना झालंय तरी काय? पित्रोदांनंतर अय्यर बरळले...

Mani Shankar Aiyar News : मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे यापुर्वीही काँग्रेसला अडचणीत आणले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी पाकिस्तानवरून पक्षाची कोंडी केली आहे.
Mani Shankar Aiyar Sam Pitroda
Mani Shankar Aiyar Sam PitrodaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस (Congress News) नेत्यांकडूनच भाजपच्या हाती आयते कोलित दिले जात आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कर आणि भारतियांच्या रंगावरून केलेल्या टिपण्णीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सभांमधून खरपूस समाचार घेत आहेत. त्याला तोंड देताना काँग्रेसची दमछाक होत आहे. त्यातच आता पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत वादग्रस्त विधान करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

मागील काही दिवसांपासून केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांसह संरक्षण मंत्र्यांकडूनही पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेबाबत (POK) सातत्याने विधाने केली जात आहे. पीओके भारताचाच (India) भाग असून पुढेही भारतातच राहील, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यावरून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, ते आपल्यावर अणुबॉम्ब टाकतील, असे विधान केले होते. (Lok Sabha Election 2024)

Mani Shankar Aiyar Sam Pitroda
Narendra Dabholkar Case : मोठी बातमी! दाभोलकर हत्या प्रकरणातील अंदुरे, कळसकरला जन्मठेप

अब्दुल्ला यांच्यानंतर आता अय्यर (Mani Shankar Aiyar) यांनीही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगत ते भारताने विसरू नये असा सल्लाही दिला आहे. पाकिस्तानचा (Pakistan) आदर केला तर ते शांत राहतील. आपण त्यांना कमी लेखत राहिलो तर लाहोरमध्ये कुणीतरी वेडा येईल आणि बॉम्ब टाकेल, असे अय्यर म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका मुलाखतीत बोलताना अय्यर यांनी हे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. भारत सरकारच्या पाकिस्तानशी चर्चा न करण्याच्या भूमिकेवर बोलताना अय्यर म्हणाले, दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत अहंकारातून आपल्याला जगासमोर कमी लेखत असल्याचे पाकिस्तानला वाटेल. अशामध्ये कुणीही वेडा बॉम्बचा वापर करू शकतो.

आपल्या समस्यांचे उत्तर कसे सापडेल, याचा विचार करायला हवा, असे सांगून अय्यर म्हणाले, हे काम तज्ज्ञांचं आहे. केवळ घृणा आणि बंदूक दाखवून आपण परिस्थिती बदलू शकत नाही. पाकिस्तानला आत्मसन्मान आहे, हे समजून घ्यायला हवे. आपल्याचा त्यांचा आदर काय ठेवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी. आपण चर्चा करत नसल्याने तणाव वाढत असल्याचे अय्यर म्हणाले.

Mani Shankar Aiyar Sam Pitroda
Narendra Dabholkar Murder Case : मारेकऱ्यांना जन्मठेप, पण मास्टरमाइंडच्या शिक्षेसाठी हायकोर्टात लढाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com