Goa News: 'गोव्याला देशासोबत 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असते, तर 74 स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले नसते.', असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्ती दिनाच्या पूर्व संध्येला केले. गोवा 19 डिसेंबर 1961रोजी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला होता. राज्यात हा दिवस 'मुक्ती दिन' म्हणून साजरा केला जातो.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या हस्ते गोवा मुक्तीच्या लढ्यात 1955 ते 1961 या काळात शहीद झालेल्या 14 स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा गुरूवारी मुक्ती सोहळ्यात गौरव केला जाणार आहे . तसेच, सर्वांना प्रत्येकी 10 लाख रूपयांचे अर्थ सहाय्य केले जाणार आहे.
या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते. गोव्याला देशासोबत 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाले असते तर 74 स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले नसते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर (Congress) अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
शेषनाथ वाडेकर आणि तुळशीराम हिरवे गुरुजी यांचे कुटुंबीय गोव्याबाहेरील असूनही गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. परंतु गोव्यातील ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी मिळाली आहे ते कधीच या कार्यक्रमाला उपस्थिती लावत नाही, ही मोठी खंत आहे. त्यांनीही गोवा (Goa) मुक्ती कार्यक्रमाला उपस्थिती लावायला हवी, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सुमारे 450 वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून 19 डिसेंबर 1961रोजी गोवा मुक्त झाला. भारतीय सैनिकांनी राबवलेल्या ऑपरेशन विजयच्या मदतीने पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावण्यात आले. यादिवशी गोव्यात भारतीय ध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.