Gunaratna Sadavarte : सदावर्तेंचा काँग्रेसवर हल्लाबोल; राहुल गांधीं अन् मल्लिकार्जुन खर्गेंना दिला इशारा, म्हणाले...

Gunaratna Sadavarte criticized Congress : काँग्रेस देशाच्या राजकारणाला नीच पातळीला पोहचणवण्याच प्रयत्न करत आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

Gunaratna Sadavarte on Dr. Babasaheb Ambedkar and Congress : सध्या लोकसभा अन् राज्यसभेत संविधान अन् डॉ. बाबासाहेबांच्या मुद्य्यावरून घमासान सुरू आहे. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. शहांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. यावरून आता कायम चर्चेत राहणाऱ्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

धाराशिवमध्ये मीडियाशी बोलताना सदावर्ते म्हणाले, 'काँग्रेसचं(Congress) फोडा आणि राज्य करा धोरण आहे. अत्यंत चुकीचं धोरण आहे. एखाद्या वाक्याची तोडमोड करून सांगण्यात माहीर आहेत. हे किती खालची पातळी गाठतील याची काही मर्यादा नाही. बॅरीस्टर गांधी पहिल्यांदा वैचारिक हत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची केली होती, यांचं त्यांच्याकडे उत्तर आहे का?'

तसेच 'अमित शाह(Amit Shah) यांनी उदाहरण देण्याचा प्रयत्न केला की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा काय होता? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रतीच नाहीतर संविधानाच्या प्रती नेहरू घराणं कसं वर्तण करत होतं? हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, त्यातील काही वाक्य तोडून ही काँग्रेस देशाच्या राजकारणाला नीच पातळीला पोहचणवण्याच प्रयत्न करत आहे. याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे.' अशा शब्दांत सदावर्तेंनी टीका केली.

Gunaratna Sadavarte
Amit Shah : आंबेडकरांविषयी अमित शहांच्या कोणत्या विधानामुळे विरोधकांचा संताप? दिल्लीसह महाराष्ट्रतही पडसाद

याशिवाय 'मला काँग्रेसला हे सांगायचं आहे, खर्गेंना हे सांगायचं आहे की अर्ध म्हाताऱ्या राहुल गांधीला(Rahul Gandhi) सांगायचं आहे, की तू नाहकपणे जातीजाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. जेणेकरून. मागासवर्गीयांना, आंबेडकरी विचारांच्या लोकांना नाहकपणे काहीतरी भाषेची तोडमोड करून कुठंतरी वणवा पेटेवा, माणसांची मनं दुभंगतील.' असंही सदावर्ते म्हणाले.

याचबरोबर 'खर्गे एक लक्षात ठेवा येणारे मुख्य न्यायमूर्ती हे शेड्यूल कास्टचे असतील, हा संविधानाचा विजय आहे. खर्गे तुम्हाला मी सांगतो की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायमूर्ती शेड्यूल कास्टचे, ओबीसी, महिला किती न्यायमूर्ती आहेत हे तपासून बघा. हे काँग्रेसने कधी केलं का? खर्गेंनी इतिहास तपासून बघावं.' असं सदावर्तेंनी सांगितलं आहे.

Gunaratna Sadavarte
Amit Shah : काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घातली! आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादावर शहांची पहिली प्रतिक्रिया...

तसेच, 'मी पहिला माणूस होतो सांगणारा, की संविधानाचा पानावर रामराज्य रेखाटलेलं आहे. हे मी सांगितलेलं आहे आणि आज अमित शाह यांनी देखील त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. त्या गोष्टीवर चर्चा केली आहे. भगवान बुद्धांचे, भगवान महावीरांचे, प्रभू रामचंद्राचं रामराज्य रेखाटलेलं आहे. त्यामुळे मला असं म्हणायंच आहे, की ही जी वैचारिक पातळी आहे ही काँग्रेसची कायम भूमिका राहिलेली आहे.' अशाप्रकारे गुणरत्न सदावर्ते यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते अमित शाह?

संविधानावर बोलत असताना अमित शाह आंबेडकरांविषयी म्हणाले होते की, आजकाल फॅशन झाली आहे, आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर. एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्गात स्थान मिळाले असते. चांगली गोष्ट आहे. आम्हाला आनंद आहे की, आता आंबेडकरांचे नाव घेत आहेत. त्यांचे नाव शंभरवेळा घ्या. पण त्यासोबत त्यांच्याप्रती तुमच्या भावना काय आहेत, हे मी सांगतो.

आंबेडकरांना पहिल्या कॅबिनेटमधून राजीनामा का द्यावा लागला?, असा सवाल करत शहांना यामागची कारणे सांगितले. ज्यांचा विरोध करता, त्यांचा मतांसाठी नाव घेणे किती योग्य आहे, अशी टीकाही शाह यांनी केली होती. शाह यांनी इतरही काही मुद्द्यांवर काँग्रेसवर निशाणा साधला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com