Pramod Sawant Sarkarnama
देश

Pramod Sawant : एकालाही सोडणार नाही पत्नीवर आरोप करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई; सीएम सावंतांचा इशारा

Pramod Sawant on Cash for job Scandal : ज्यांनी-ज्यांनी खोटेनाटे आरोप केले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, एकालाही सोडणार नाही, असा सज्‍जड इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

Rashmi Mane

Goa News : गोव्यातील राजकारणात सध्या घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी आणखी एक घोटाळा समोर आला होता. नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेण्याचे आणि फसवणूक करायची असा हा घोटाळा आहे. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीवर ‘आप’च्‍या नेत्‍यांनी आरोप केले आहेत.

यावर बोलतांना सावंत म्हणाले,"‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात माझ्या पत्नीवर विरोधकांकडून खोटे आरोप करण्‍यात येत आहेत. माझी पत्नी सरकारच्या कोणत्याच प्रशासकीय कामात सहभागी होत नाही. ज्यांनी-ज्यांनी खोटेनाटे आरोप केले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, एकालाही सोडणार नाही, असा सज्‍जड इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिला.

दाबोळी विमानतळावर पत्रकारांनी ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात बाबत ‘आप’च्‍या नेत्‍यांनी केलेल्‍या आरोपांविषयी विचारले असता ते म्‍हणाले, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्‍याप्रकरणी पोलिस योग्‍य पद्धतीने तपास करत आहेत. आता ‘ईडी’ही तपास करेल. एकूणच प्रक्रिया निष्‍पक्षपणे सुरू आहे.

विरोधक सैरभैर झाल्‍याने ते बेछूट आरोप करत आहेत. माझ्‍या 25 वर्षांच्‍या राजकीय कारकिर्दीत, असे कधीही खालच्‍या पातळीवरील आरोप झालेले नाहीत. अबकारी घोटाळ्यात जामिनावर बाहेर असलेल्‍यांनी असे आरोप बिलकूल करू नयेत, असेही मुख्‍यमंत्री ‘आप’च्या नेत्यांना उद्देशून म्‍हणाले.

दुसरीकडे मात्र, या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काही दिवसांपूर्वी रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणात एजंटांना अटक करण्यात असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य नसल्याचे पार्सेकर म्हणाले होते.

पार्सेकर म्हणाले की, "पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही क्लीन चीट देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT