CM Pramod Sawant Sarkarnama
देश

Pramod Sawant : '2047 पर्यंत दिल्ली अन् गोव्यात सत्तेत भाजपच'; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी वर्तवलं राजकीय भविष्य!

CM Pramod Sawant on Delhi Election Result : भाजपच्या मिळालेल्या विजयाचा गोव्यात देखील जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमोद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Pramod Sawant on BJP Victory in Delhi Election 2025 Result : राजधानी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर सकारात्मक झालेल्या भाजपने दिल्लीत जोरदार प्रचार करत २७ वर्षानंतर सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. भाजपच्या मिळालेल्या विजयाचा गोव्यात देखील जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री सावंत(Pramod Sawant) यांनी २०४७ पर्यंत दिल्ली आणि गोव्यात भाजपचेच सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात बहुमत मिळाले आहे. भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या असून, केजरीवालांच्या आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले.

तर "दिल्लीत प्रचार करत असताना तेथील लोक आपच्या सत्तेला कंटाळले असल्याचे दिसून आले. दिल्लीत भाजपची(BJP) सत्ता येण्याची वाट आपण गेल्या दहा वर्षापासून पाहत होतो. आता भाजपला राज्यात बहुमत मिळाले असून, मी पंतप्रधान मोदी, जे. पी. नड्डा यांचे अभिनंदन करतो." असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

याशिवाय प्रमोद सावंत म्हणाले, "आम आदमी पक्षाने गेल्या दहा वर्षापासून देशाची राजधानी दिल्लीत घाण केली होती, ती स्वच्छ करण्याची संधी नागरिकांनी भाजपला दिली आहे. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा संदेश लोकांनी दिला आहे. मद्य घोटाळ्यात आपचे पाच नेते तुरुंगात होते. डबल इंजिन सरकार असेल तर विकास होतो हे नागरिकांना आता समजलंय". तर

गोवा(GOA) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त करताना दिल्लीतील नागरिकांचे आभार मानत विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT