Ishan Kishan with Father Pranav Pandey Sarkarnama
देश

Ishan Kishan : धडाकेबाज क्रिकेटरचे वडील राजकारणात; विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार?

Pranav Pandey JDU Nitish Kumar Assembly Election : भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज इशान किशन याचे वडील प्रणव कुमार पांडे यांनी रविवारी राजकारणात एन्ट्री केली आहे.  

Rajanand More

Bihar Politics : क्रिकेटपटूंसह त्यांच्या नातेवाईकांची राजकारणातील एन्ट्री नवी नाही. काही महिन्यांपूर्वीच ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याची पत्नी गुजरातमध्ये भाजपची आमदार आहे. आता आणखी एका क्रिकेटपटूचे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे.

भारतीय क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज इशान किशन याचे वडील प्रणव पांडे यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. पांडे यांनी रविवारी बिहारमधील संयुक्त जनता दलामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ते पक्षाचे प्राथमिक सदस्य बनले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या उपस्थितीत पांडे यांचा पक्षप्रवेश झाला.

बिहारमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. इतर पक्षातील नेते किंवा दिग्गज लोकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. प्रणव पांडे हे बिल्डर असून त्यांचे कुटुंब पटनामध्ये राहते. ते भूमिहार ब्राम्हण कुटुंबातील आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून पांडेंना नवादा किंवा ओबरा या विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यासाठी निवडणुकीच्या काही महिने आधी पांडेंना पक्षात आणण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटचे मैदाना गाजवणारा इशान किशनचे वडील राजकीय मैदानात विरोधकांना छोबीपछाड देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

आरजेडीमध्ये शहाबुद्दीनचे कुटुंब

लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये रविवारी गँगस्टर व माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनच्या पत्नी हीना व मुलगा ओसामा यांनी प्रवेश केला. शहाबद्दीनचा तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते आरजेडीचेच खासदार होते. ओसामा यांनी पहिल्यांदाच राजकीय मैदानात उडी घेतली आहे. या पक्षप्रवेशानंतर भाजपसह विरोधकांनी आरजेडीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT