Narendra Modi : ‘डिजिटल अरेस्ट’पासून कसे वाचायचे? पंतप्रधान मोदींनी सांगितला फॉर्म्यूला

Digital Arrest Scam Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये देशवासियांना डिजिटल असेस्टबाबत सतर्क केले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील काही महिन्यांसाठी देशात डिजिटल अरेस्टचा मुद्दा चांगलाच तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी मन की बात या कार्यक्रमात त्याची दखल घेत देशवासियांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. सरकारी तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना फोनवर धमकावले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

डिजिटल अरेस्टच्या घटना रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींना नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले. ते म्हणाले, या फसवणुकीच्या घटनांमध्ये संबंधितांना आधी लोकांची खासगी माहिती एकत्रित केली जाते. त्यानंतर त्यांच्याभोवती भीतीचे वातावरण तयार केले जाते. आणि त्यानंतर वेळेचा दबाव टाकला जातो. लोक इतके घाबरून जातात की विचारही करत नाहीत.

Narendra Modi
Osama Shahab : देशाच्या राजकारणात 'ओसामा'चा उदय; का होतेय चर्चा, कोणत्या पक्षाने दिला आधार?

सर्वच वयोगटातील लोक या फसवणुकीला बळी पडत आहेत. अनेक जण आपल्या मेहनतीचे लाखो रुपये गमावून बसले आहेत. कुणाला अशाप्रकारचा फोन आला तर घाबरून जाऊ नका, असे आवाहन मोदींनी केले. अशा प्रकरणांमध्ये डिजिटल सुरक्षेसाठी तीन उपाययोजना करायला हव्यात. थांबा, विचार करा आणि त्यानुसार कार्यवाही करा, असे मोदी म्हणाले.

फोन आल्यानंतर शक्य असल्यास स्क्रीनशॉट काढा किंवा रेकॉर्डिंग करा. कोणतीही सरकारी यंत्रणा पोन करून अशाप्रकारे धमकी देत नाही आणि पैशांचीही मागणी करत नाही. या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर कॉल करा, पोलिसांकडे तक्रार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Narendra Modi
Sushant Singh Rajput : मोठी किंमत चुकवावी लागेल! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दणका

दरम्यान, मागील काही महिन्यांत डिजिटल अरेस्ट ची प्रकरणे समोर आली आहेत. मागील महिन्यात वर्धमान समुहाचे अध्यक्ष अस. पी. ओसवाल यांनाची तब्बल 7 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींना आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्यावर डिजिटल वॉच ठेवला होता. तसेच मनी लाँन्ड्रिंगचे आरोप करून पैशांची मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com