Bihar Vidhan Sabha Election and Prashant Kishor : राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलांवर हल्लाबोल करत, पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले की ३० वर्षांपासून मुस्लिमांचे नेते असल्याचा दावा करणाऱ्यांनी जर हिंमत असेल तर मुस्लिमांची जेवढी जनसंख्या आहे, त्यांना तेवढ्या जागा देवून दाखवाव्यात.
याचबरोबर त्यांनी यावेळी हे देखील घोषणा केली की, जन सुराज पक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत ४० जागांवर मुस्लीम उमेदवारांना तिकीट देईल आणि ज्या ठिकाणी राजदचा मुस्लीम उमेदवार असेल तिथे मी हिंदू उमेदवार उभा करेन. याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की आमची लढाई राजद सोबत नाही, तर थेट एनडीएशी(NDA) आहे. एवढंच नाहीतर त्यांनी असाही दावा केला की पुढील वर्षात २०२५मध्ये जन सुराज पक्षाचा मुख्यमंत्री बनेल. राजद तीनमध्येही नाही आणि तेरामध्येही नाही.
प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी म्हटले की, राष्ट्रीय जनता दलाचे लोक जे मागील 30 वर्षांपासून मुस्लिमांचे नेते असल्याचा दावा करतात, मी त्यांना आज याच सभेतून आणि मंचावरून आव्हान देत आहे की, जर ते असं म्हणत असतील की जन सुराज पक्षाचे लोक येतील, कोणी मुस्लिमाने जर त्यांना मत दिलं तर मतविभाजन होईल. तर मी त्यांना हे सांगत आहे की, जिथेही तुमचे मुस्लीम उमेदवार विजयी झाले असतील, तुम्ही तिथे मुस्लीम उमेदवारालाच उभा करा आणि तुम्ही जिथे मुस्लीम उमेदवार उभा कराल तिथे मी मुस्लीम नाहीतर हिंदू उमेदवार उभा करून निवडणूक लढवेन.
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलासा(RJD) आव्हान देत म्हटले की, मागील ३० वर्षांपासून ज्या मुस्लिमांची तुम्ही मतं घेत आला आहात, त्यांना फसवणं थांबवा आणि हिंमत असेल तर त्यांच्या लोकसंख्येनुसार तिकीट देवून दाखवा.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.