Prashant Kishor News : उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपला किती नुकसान? प्रशांत किशोर यांनी केलं विश्लेषण

Prashant Kishor on Bjp : बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये भाजपच्या जागा वाढत असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
Prashant Kishor
Prashant Kishorsarkarnama

Prashant Kishor News, 28 May : लोकसभा निवडणुकीच्या ( lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्याकडून राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात येत आहे. आता प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जागांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यासह भाजपने 2019 मध्ये 303 पैकी देशातील उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये 250 जागा जिंकल्या होत्या. पण, यंदा उत्तर-पश्चिमेकडील राज्यांमध्ये भाजपला 50 जागांचे नुकसान होणार आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) म्हणाले, "2019 आणि 2024 च्या निवडणुकीची तुलना केली जात आहे. 2019 मध्ये भाजपनं 303 जागा जिंकल्या होत्या. त्यातील 250 जागा देशातील उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये 50 हून जास्त जागांचं नुकसान होणार आहे."


(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाजपला पूर्व-दक्षिणमधील राज्यांमध्ये फायदा होईल. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश राज्यांत भाजपकडे आता 50 जागा आहेत. पण, 2024 च्या निवडणुकीत भाजपचे मतदान टक्केवारी आणि जागा दोन्ही वाढत आहेत. बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये भाजपच्या 15 ते 20 जागा वाढत आहेत," असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

"योगेंद्र यादव यांनी म्हटलं की, भाजपला 272 जागा गाठता येणार नाही. त्यांच्या मते 268 जागांवर भाजपची घौडदौड थांबेल. तरीही सत्तेत भाजपच येईल, असं यादव यांचं म्हणणं आहे. लोकांना वाटतेय की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपला मोठं नुकसान होणार आहे. सध्या भाजपचे महाराष्ट्रात 23 खासदार आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षानं 20 ते 25 जागा जिंकल्या तरी, यंदा भाजपचे काहीही नुकसान होणार नाही," असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

Prashant Kishor
Prashant Kishor News : महाविकास आघाडीच्या जागा सांगतानाच प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

"भाजपला उत्तर प्रदेशात नुकसान होत आहे, असं काहींचं मत आहे. पण, हे लोक विरसत आहेत की 2019 मध्ये भाजपला 2014 च्या तुलनेत बिहार आणि उत्तर प्रदेशात 25 जागांचे नुकसान झालं होतं. कारण, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र लढले होते. यंदा उत्तर प्रदेशात भाजपच्या 20 जागा कमी होतील, असं कोण म्हणत असेल, तर माझं मत असे आहे की भाजप आधीच 18 जागा पराभूत झाला आहे. 40 ते 50 जागांचं नुकसान होईल, तेव्हाचा भाजपला फटका बसेल. पण, असं विरोधी पक्ष म्हणतोय ना सत्ताधारी. यंदा बिहारमध्ये भाजपला फटका बसेल, असं चित्र दिसत नाही," असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

Prashant Kishor
Prashant Kishor News : प्रशांत किशोर भडकले, काँग्रेसचा पराभव होणार म्हटल्याचे व्हिडिओ दाखवण्याचे दिले चॅलेंज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com