New Delhi News : आपल्या सुरेल आवाज आणि उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग आता राजकारणात एन्ट्री करणार आहे. राजकारणातील मास्टरमाइंड मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे सदस्यत्व त्या स्वीकारणार आहेत. त्यामुळे अक्षरा लोकसभा निवडणुकीतही आपले नशीब आजमावू शकते असे बोले जात आहे.
प्रशांत किशोर बिहारमध्ये जनसुराज यात्रा काढणार आहेत. या निमित्ताने ते गावोगावी फिरून लोकांना सध्याच्या देशातील आणि बिहारमधील राजकारणाबाबत लोकांना जागृत करणार आहेत. यापूर्वीदेखील त्यांनी बिहारमधील महाआघाडी सरकार आणि भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पार्श्वभूमीवर अक्षरा सिंग या भोजपुरी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव प्रशांत किशोर यांच्या सोबत जोडले जाणार आहे. अक्षराचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या पालकांनीही भोजपुरी अभिनेते-अभिनेत्री म्हणून काम केले आहे. अक्षराला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, हीच आवड तिला कला क्षेत्रात घेऊन अाली आहे.
अक्षरा सिंग गेल्या 13 वर्षांपासून बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. अक्षराने 2013 मध्ये रवी किशनसोबत पहिला चित्रपट केला होता. सत्यमेव जयते हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी प्राण जाए पर वचन ना जाए, सत्या, माँ तुझे सलाम अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर अक्षराने अनेक सुपरहिट गाणीही गायली आहेत. मात्र, हाच आवाज आता राजकीय भाषणांमध्ये घुमणार आहे.
(Edited by Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.