Prashant Kishor  Sarkarnama
देश

प्रशांत किशोर यांच्या दहा मोठ्या घोषणा ; अशी आहे रणनीती

लालू प्रसाद यादव आणि नितीश यांच्या राजवटीत 30 वर्षानंतरही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी आज पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन नवा पक्ष स्थापन करणार की नाही, याबाबत स्पष्टीकरण दिले. बिहारमध्ये (Bihar) 'जन-सुराज' (गुड गव्हर्नन्स) आणण्यासाठी त्यांनी आपला प्लॅन सांगितला. येत्या दोन ऑक्टोबरपासून बिहारमधील पश्चिम चंपारण येथून 3 हजार किलोमीटरची पदयात्रा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (Prashant Kishor Latest News)

"परिवर्तनाचा विचार असलेले १७ हजारहून अधिक जण संपर्कात आहेत. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या यादीत यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे," असे प्रशांत किशोर म्हणाले.

"बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या यादीत यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव आणि नितीश यांच्या राजवटीच्या 30 वर्षानंतरही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे.मी पुढील तीन-चार वर्षे बिहारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात घालवीन. सार्वजनिक सुरक्षेसाठी ते गावोगावी जाऊन प्रत्येक लोकांशी संपर्क साधणार," असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

प्रशांत किशोर म्हणाले,"सध्या मी कोणताही राजकीय पक्ष काढणार नसून 17 हजार लोकांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. या परिस्थितीत सर्व लोक पक्ष स्थापन करण्यास तयार असतील तर पक्ष स्थापन करण्याचा विचार केला जाईल, परंतु तो पक्ष केवळ माझा नसून त्यात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचा असेल,"

बिहारसाठी प्रशांत किशोर यांच्या दहा घोषणा

  1. अराजकीय व्यक्तींशी संवाद साधणार

  2. पक्ष स्थापन करण्याची गरज असल्यास तसा विचार करणार

  3. बिहारच्या जनतेच्या अपेक्षा जाणून घेणार

  4. दोन आँक्टोबरपासून पश्चिम चंपारण येथून पदयात्रेस सुरवात

  5. तीन हजार किलोमीटर पदयात्रा वर्षभरात पूर्ण होणार

  6. 'जन-सुराज' (गुड गव्हर्नन्स)संकल्पना जनतेपर्यंत पोहचविणार

  7. पूर्ण ताकदीने बिहारच्या जनतेसोबत काम करण्यास सक्षम

  8. जनतेशी संवाद साधण्यावर पूर्ण फोकस

  9. बिहारमध्ये परिवर्तन करण्याची जिद्ध असलेल्यांना एकत्र जोडणार

  10. जातीवर नव्हे तर समाजातील सगळ्यांना एकत्र आणणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT